
बहुचर्चित कोलाड येथील खुनाचा रायगड LCB ने अखेर केला उलगडा…
रायगड- सवीस्तर व्रुत्त असे की दि 21.08.2023 रोजी दुपारी 2.00 वाजण्याचे सुमारास चंद्रकांत कांबळे वय-53 वर्षे रा.पाले बु.ता.रोहा यांची तिसे रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना इसमाने डोक्यामध्ये गोळी घालुन हत्या केली होती. सदर घटनेबाबत कोलाड पोलिस ठाणे गु.र.क्र.83/2023 भा.दं.सं कलम 302 सह शस्त्र अधी.चे कलम 3,27प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय
पोलिस अधिकारी, रोहा विभाग श्रीम. सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, यांनी घटनास्थळी भेट दिली.सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम यांना करण्याचे आदेश दिले. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. तसेच पोलीस निरीक्षक संजय बांगर, नियंत्रण कक्ष, पोलिस निरीक्षक खोपोली पोलिस
ठाणे, शितल राउत, सहा पोलिस निरीक्षक, साबळे, कोलाड पोलिस ठाणे, सहा. पोलिस निरीक्षक पोमन, नागोठणे पोलिस ठाणे यांचे नेतृत्वात वेगवेगळी पथके तयार करून तपास चालू करण्यात
आला. सदर तपास पथकाकडून तपासा संदर्भातला आढावा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक हे घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण, विशाल शिर्के व स्थानिक गुन्हे शाखेतिल 24 पोलिस अंमलदार यांची 04 पथके तयार करून त्यांचेकडे तपासासंदर्भात वेगवेगळी कामगिरी सोपविली. त्यामध्ये पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण व 04 अंमलदार यांना डम्प डाटा व सीडीआर बाबत तांत्रिक विश्लेषण
करण्याचे आदेश देण्यात आले. सदर सायबर पोलिस ठाणेतील, पो. ना. तुषार घरत, पो. ना. अक्षय पाटील यांचे सहाय्याने तांत्रिक विश्लेषण केले. मयत चंद्रकांत कांबळे यांची कर्तव्यावर गोळी मारून निर्घुण हत्या करण्यात आली होती. सदरची हत्या कोणत्या कारणा मधून व कोणी केली असावी ? याबाबतचा उद्देशाची माहिती प्राप्त
करणेकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या वर नमूद ४ पथका सह तपास करत होते. त्यामध्ये मयत चंद्रकांत कांबळे यांचे सामाजिक क्षेत्रातील, मालमत्तेच्या संबंधातून हत्या झाली असेल का? याबाबत तपास करणेत आला. सदर तपासा दरम्यान अशी माहिती प्राप्त झाली की, मयत इसम यांची बहीण विमल हिचा विवाह विजय रमेश शेट्टी याचेसोबत झाला होता. सन 2016 मध्ये विजय रमेश शेट्टी व विमल या दोघांचे नावाने धाटाव, ता.रोहा येथे त्यांनी रूम खरेदी केली होती. विजय व त्याची पत्नी यांचे दोघांच्यात पटत नसून विमल ही तिचे माहेरी मयत भाऊ चंद्रकांत याचेकडे राहण्यास होती. तसेच विजय शेट्टी याचेकडे घटस्फोट मागत होती. मयत चंद्रकांत कांबळे हे बहिण विमल हिला पोटगी म्हणून 10 लाख रुपये मागत होते. त्यावेळी सदर कारणावरून विजय शेट्टी याने त्याची पत्नी विमल शेट्टी हिचेकडे मयत चंद्रकांत कांबळे यांना जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली त्यावरून त्यांनी आपल्या चार पथकांमार्फत विजय शेट्टी ची गोपिनीय माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी विजय शेट्टी हा घटनेच्या दिवशी दिसून आला व त्याला जाताना येताना काही इसमांनी पहिले होते. त्याचे धाटाव येथील घरावर पाळत ठेवण्यात आली. त्याचे घराचे बाजूला पार्क असलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल यावर नंबरप्लेट नव्हती. सदर मोटार सायकलचे चॅसीस व इंजिन नंबरवरून ती मोटार सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे संशय बळावला. त्यानंतर त्याचे धाटाव येथील घराची घर झडती घेतली असता, त्यात नमूद गुन्ह्याचे संबंधी कागदोपत्रे पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे घटना स्थळावर जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यामध्ये आरोपी विजय हा सदर मोटार सायकल वरून जाताना/येताना दिसून आला. त्यामुळे सदरचा गुन्हा विजय शेट्टी यानेच केल्याचा पुराव्यासह निष्पन्न झाले. विजय शेट्टी याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील
पथके शोध घेत होती. सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी विजय शेट्टी याने त्याचेकडे असलेली दुसरी मोटार सायकल पेण याठिकाणी त्याचे मित्राकडे ठेवल्याचे आढळून आले, तांत्रिक तपासादरम्यान तो गुन्हा केल्यानंतर काही दिवसांनी अलिबाग येथे एका मित्राला भेटून गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच तांत्रिक
तपास करीत असताना आरोपी अक्कलकोट, जिल्हा सोलापूर याठिकाणी असल्याचे विश्वसनीयरित्या खात्री झाली. त्याचे तपासकामी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, विकास चव्हाण, पोहवा/जितेंद्र चव्हाण, अमोल हंबीर,/प्रतिक सावंत, पोशि/अक्षय सावंत असे पथक तयार करून पोलिस अधीक्षक यांची परवानगी घेवून अक्कलकोट येथे रवाना झाले होते. सदर पथकाने आपले तपासाचे कौशल्य दाखवून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात अहोरात्र शोध मोहीम राबिवली. सदर आरोपीनेगुन्हा करणेकरिता वापरलेले व त्याचेजवळ असलेले आणखी एक असे 02सगावठी पिस्टल त्याचे स्वत:कडे बाळगून असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. तसेच सदर आरोपीताच्या पूर्व इतिहासाबाबत माहिती घेतली असता 90 च्या दशकातत्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या केली होती. तसेच सन 1999 साली उरण येथील ओबीजे कंपनीचे मॅनेजर व त्याचा ड्रायव्हर अशा दोन इसमांना गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे सदर आरोपी निर्दयी व गोळ्या घालून हत्या करण्यात
सराईत गुन्हेगार असल्याने त्याला शिताफीने पकडण्यात पोलिसांसमोर आव्हान होते. तरीदेखील वर नमूद स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी आपला जीव धोक्यात घालून सदर आरोपीतास अक्कलकोट येथील स्वामी समर्थमंदिर परिसरातून कौशल्यपूर्ण व शिताफीने ताब्यात घेवून कोलाड याठिकाणी आणून अटक केली आहे. अटक आरोपी विजय रमेश शेट्टी हा कलबुरगी, कर्नाटक राज्य येथील मूल रहिवासी
असून वयाचे १५ व्या वर्षी त्याचे भावा सोबत रेतीबंदर येथे कामानिमित्त आला होता त्याचे मुळ नाव लक्ष्मिकांत रेवाणसिद्धप्पा कलशेट्टी, असून तो महाराष्ट्र मध्ये रेतीबंदर, बेलापूर येथे वास्तव्यास होता व तो विजय रमेश शेट्टी या नावाने राहत होता. अटक आरोपी विजय रमेश शेट्टी याने त्याची पत्नीचा भाऊ चंद्रकांत सटू कांबळे यास तो कोलाड येथे रेल्वेमध्ये गेटमेन म्हणून हजर असताना त्याची गोळी घालून निर्घृण हत्या केली आहे. सदर आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून रोहा न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक
23/09/2023 रोजी पर्यत 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे. त्यानंतर सदर अटक आरोपी दोन गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह, एक एक्स्ट्रा मॅग्झीनव 18 जिवंत काडतुसे, 1
रिकामी पुंगळी, हे लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून हस्तगत केले आहे. व सदरचे दोन्ही हत्यार त्याने चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणेसाठी 2 महीने पूर्वी बनारस उत्तरप्रदेश येथून दिड लाख
रुपये किमतीस त्याने विकत आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदारची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उप निरीक्षक धनाजी साठे,
विकास चव्हाण, विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार ASI प्रसाद पाटील, दीपक मोरे, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, पोलिस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलिस शिपाई ईश्वर लंबोटे,भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे,लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


