सांगली पोलिसांनी आंध्रप्रदेशात घातलेल्या दरोड्याचे आरोपी केले जेरबंद…
सांगली – सवीस्तर व्रुत्त असे की आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून 1 कोटी 77 लाख रूपयांच्या
सोन्यासह तिघांनी महाराष्ट्र मध्ये पलायन केले होते सांगलीजवळील बुधगाव येथे सांगली पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने तिघांना अटक केली आहे.
सूरज कुंभार (वय 33, कुर्ली ता. खानापूर),
कैलास शेळके (वय 30 रा. बामणी, ता. खानापूर)
सादीक शेख (वय 35 रा. इचलकरंजी)
अशी या तिघांची नावे असून त्याना अटक करत पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
नामदेव देवकर यांचा वंगुरवाडी रोड, टुनुक आंध्र प्रदेश येथे गलाई व्यवसाय असून ते त्याच ठिकाणी पत्नीसह वास्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकानातील कामगार सूरज कुंभार व त्याचे साथीदारांनी घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि एक लाखाची रोकड असा 1 कोटी 77 लाख 81 हजाराचा ऐवज लंपास केला होती तिघांनीही दरोडा टाकून फिर्यादी देवकर यांची ऑल्टो मोटार घेउन पलायन केले होते.
याबाबत टुनुक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित सांगली जिल्ह्यात आल्याची तांत्रिक माहिती आंध्र पोलीसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पोलिस अधिक्षक सांगली बसवराज तेली यांच्याशी संपर्क करुन संबंधीत घटनाक्रम सांगीतला त्यानुसार त्यांनी त्यांना पोलिस बळ पुरवून सदर गुन्ह्यातील आरोपी हे बुधगाव येथील एका ढाब्यावर दिसल्याने संशयितांना . त्यांना पलायनाची संधी न देता पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता दरोड्यात लुटलेले सोने पिशवीत आढळले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.