
रेकॉर्डवरील अट्टल गुंड मोन्या यास चिखली पोलिसांनी केले तडीपार…
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास चिखली पोलिसांनी केले तडीपार…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासुन आयुक्तालयातील गुन्हेगारीचे समूळ उच्छाटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. भरकटलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी दिशा उपक्रम सुरु केलेला, या उपक्रमातून बरेचसे विधिसंघर्ष बालकांना प्रबोधन करुन, त्यांच्याकडील कला गुणाच्या क्षेत्रात संधी मिळवुन देण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही ज्या सराईत गुन्हेगाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्याच्याविरोधात मोका, तडीपार सारख्या कठोर करवाया करण्यात आलेल्या आहेत. या मध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय २२ वर्षे) रा.पंचवटी हौ.सोसा. गल्ली नं.२ यश प्लाजा जवळ, शरदनगर, चिखली, पुणे याच्यावर कारवाई करून त्याला पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण चे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार आज रोजी आरोपी आदर्श उर्फ़ मोन्या विठ्ठल लुडेकर यास दोन वर्षाकरीता नागपुर येथे तडीपार केलेले आहे.


चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय २२ वर्षे) रा.पंचवटी हौ.सोसा. गल्ली नं.२ यश प्लाजा जवळ, शरदनगर, चिखली, पुणे ह्याचे वर्तनातही सुधारणा होत नव्हती. तो काही एक कामधंदा करीत नसुन त्याने स्वतःची गैंग तयार केलेली होती. तो घातक शस्त्रे जवळ बाळगुन चिखली पोलीस स्टेशनच्या व आसपासच्या परिसरात त्याचे गुंड साथीदारांसह गंभिर स्वरुपाचे गुन्हे नियमितपणे करीत होता. त्याचेवर चिखली पोलिस स्टेशन मध्ये जबरी चोरी, अवैध रित्या शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापती करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याच्या या गुंडगिरी व दादागिरीमुळे चिखली परीसरात दहशत निर्माण झालेली होती. त्याच्या दहशतीमुळे व भिती पोटी सर्व सामान्य नागरीक त्यास विरोध करण्यास किंवा पोलिसांकडे तक्रार देण्यास सहसा धजावत नव्हते. त्याच्या गुंडगिरीमुळे परिसरातील सभ्य नागरीक तसेच लहान मोठे व्यवसायीक, गोरगरीब जनता याना दैनंदिन जिवन जगणे, व्यवसाय करणे कठीण होत चालले होते.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्याची असलेली दहशत व गुंडगिरी मोडुन काढण्याचे उद्देशाने चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो शिवाजी पवार, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ३ यांना सादर केला होता. पोलीस उपआयुकत डॉ.शिवाजी पवार यांनी सदर प्रस्तावाची गंभीरपणे दखल घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर यास पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण चे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार आज रोजी आरोपी आदर्श उर्फ़ मोन्या विठ्ठल लुडेकर यास दोन वर्षाकरीता नागपुर येथे तडीपार केलेले आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकामध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली असुन चिखली परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तडीपारीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चिखली परीसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारावर यापुढेही अश्या प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल असे
अश्वासन चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी नागरीकांना दिलेले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय चौबे,अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ शिवाजी पवार,सहा पोलिस आयुक्त भोसरी विभाग, संदीप हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, व, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि. उदधव खाडे, पोउपनिरी राजेश मासाळ, पोहवा. सचिन गायकवाड, मपोहवा. दुर्गा केदार यांनी पार पाडली आहे


