
अल्लीपुर पोलिसांचे सहकार्याने स्थागुशा पथकाने पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…
दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर अल्लीपुर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही,देशी-विदेशी दारू व स्विफ्ट कारसह एकुण 7,38,700/- रू.चा दारूसाठा केला जप्त…
अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक 09.02.2024 रोजी अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे
चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा सोनेगाव स्टेशन शिवारात धोत्रा ते येसंबा रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक MH-04-FZ-6916 हि चारचाकी कार येताना दिसली सदर कारला थाबंण्याचा इशारा केला असता पोलिसाची चाहुल लागल्याने सदर कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन जागीच सोडुन शेत शिवाराचा फायदा घेत पळुन गेला पळुन गेलेला इसम हा अक्षय पोहाणे रा. धोत्रा का. हाच असल्याची पंचाची व आमची खात्री झाली


सदर आरोपीचा शोध घेतला असता मिळुन आला नाही. मौक्यावर सदर कारची पाहणी केली असता सदर कारमध्ये मागील सिटवर व कारचे डिक्कीमध्ये खडर्याच्या खोक्यात व प्लॅस्टीक पिशवीमध्ये देशी-विदेशी दारूच्या

1) दोन खडर्याच्या खोक्यात गोवा संत्रा कपंनीच्या 180 एमएल च्या 96 सिलबंद बाटल्या,

2)सहा खर्ड्याचे खोक्यात देशी दारू प्रिमीयम सुपर डिलक्स कंपनीच्या 90 एम.एल.च्या 600 बाटल्या
3) एका प्लास्टिक देशी दारूच्या प्रिमीयम सुपर डिलक्स कंपनीच्या 180 एम.एल. च्या 70 सिलबंद बाटल्या
4) एका खडर्याच्या खोक्यात ऑफीसर चॉईस ब्लु कपंनीच्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद बाटल्या
5) एका खडर्याच्या खोक्यात इम्पीरीयल ब्लु कपंनीच्या 180 एम. एल. च्या 48 सिलबंद बाटल्या
6) एका खडर्याच्या खोक्यात रॉयल स्टॅग कपंनीच्या 375 एम. एल. च्या 24 सिलबंद बाटल्या
असा एकुन किंमत 1,38,700/- रू.चा दारुसाठा व कारसह एकुन 7,38,700 /- रू. चा मुददेमाल मिळुन आल्याने फरार आरोपी अक्षय पोहाणे, रा. धोत्रा (का.) यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क्र. 74 / 24 कलम 65(अ)(ई).77(अ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ.सागर रतन कवडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलिस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच प्रफुल चंदनखेडे पो.स्टे. अल्लीपुर यांनी केली.


