
यवतमाळ जिल्ह्यातून दारुची चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
अल्लीपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही, देशी दारू व दोन मोपेड गाडीसह एकुण 2,38,300/- रू.चा मुद्देमाल केला जप्त…..
अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धॅदे यावर कठोर कार्यवाही करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी यांना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक 12.02.2024 पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की कळंब येथील काही ईसम हे त्यांचे मोपेड गाडीने अवैध्यरित्या देशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा गडेगाव ते अलमडोह शिवारात रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक
ब्राउन रंगाची सुजुकी अॅसेस मोपेड गाडी क्रमांक MH-29-CC-4154 वर दोन इसम बसुन असलेली मोपेड गाडी येताना दिसली सदर मोपेड गाडीला पंच व पोलिस स्टॉफचे मदतीने थांबवुन
चेक केले असता सदर मोपेड गाडीचे पायदानवर प्लॅस्टीक चुगंडीमध्ये व डिक्की मध्ये देशी दारूच्या गोवा संत्रा कपंनीच्या 180 एम.एलच्या 96 सिलबंद शिश्या कि. 14,400 /- रू. मोपेड गाडीसह 1,19,400/-रू. चा मुददेमाल जप्त करून आरोपी नामे


1) राजेश पाडुरंग डुकरे, वय 19 वर्ष,

2) गणेश विजय ठाकरे, वय 20 वर्ष,

3) मुन्ना लाखीया, देशी भटटी दुकानदार ( पसार )
सर्व रा. कळंब जि. यवतमाळ यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क. 76 / 24 कलम 65(अ)(ई),77(अ). 83 म.दा.का. सहकलम 3( 1 ) 181,130 / 177 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा गडेगाव शिवारात रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक काळया रंगाची सजुकी अॅसेस मोपेड गाडी क्रमांक MH-32-AV-0910 वर दोन इसम बसुन असलेली मोपेड गाडी येताना दिसली सदर मोपेड गाडीला पंच व पोलीस स्टॉफचे मदतीने थांबवुन चेक केले असता सदर मोपेड गाडीचे पायदानवर प्लॅस्टीक चुगंडीमध्ये व डिक्की मध्ये देशी दारूच्या गोवा संत्रा कपंनीच्या 180 एम. एलच्या 126 सिलबंद शिश्या कि. 18,900 / – रू. मोपेड गाडीसह 1,18,900/-रू. चा मुददेमाल जप्त करून आरोपी नामे 1 ) सुरज गजानन बावणे, वय 31 वर्ष, 2) सांगर विजय भोयर, वय 22
वर्ष, दोन्ही रा. कळबं जि. यवतमाळ 3) मुन्ना लाखीया, देशी भटटी दुकानदार (पसार) सर्व रा. कळंब जि. यवतमाळ यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क. 77 / 24 कलम 65 (अ)(ई),77(अ), 83
म.दा.का. सहकलम 3(1)181,130 / 177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा स.पो.नि. प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे निर्देशानुसार पोलिस अमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


