
आष्टी पोलिसांनी अवैधरित्या वाळुची चोरी करुन विक्री करणाऱ्यास घेतले ताब्यात…
आष्टी पोलिसांनी आवळल्या रेती(वाळु) चोरी करुन शासनाचा महसुल बुडविणार्याच्या आवळल्या मुसक्या…
आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 05/02/2024 रोजी पोउपनि राजेश उंदिरवाडे हे रात्री 9.45 वा.चे दरम्यान पोलिस पथकासह पो.स्टे. परीसरात शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असताना, त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजा तारासावंगा परिसरातील कड नदीच्या पात्रातुन एक लाल रंगाचे मुंडके असलेल्या ट्रॅक्टर आणि लाल रंगाच्या ट्रॉली मध्ये रेती भरली जात असुन, ती रेती ही दुर्गवाडा ते तारासांवंगा रोडने घेऊन जात असुन सदर परिसरात टाकली जात असते. अशी नमुद माहीती
मिळालेवरून, सदरची माहीती ठाणेदार ठाणेदार सुनील पवार यांना माहीती देवुन, त्यांचे आदेशाने पोशि जयदिप जाधव तसेच दोन पंच असे मिळुन खात्री करण्यासाठी तसेच कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी शासकीय वाहनाने रवाना होऊन मौजा दुर्गवाडा येथे व तेथुन तारासावंगा रोडने गेले असता, एक लाल रंगाचा मुंडके आणि लाल रंगाची ट्रॉली असलेला ट्रॅक्टर जात असतांना दिसला, जवळ पोहोचताच नमुद ट्रॅक्टर चालक यांनी त्याचे ताब्यातील ट्रक्टर हा दुर्गवाडा – तारासांवंगा येथे जाणार्या रोडला लागुनच पोल्ट्रीफाँम जवळ नेले असता त्यास पंचासमक्ष हाताने थाबवण्याचा ईशारा केला असता ट्रक्टर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर थांबविला असता पंचासमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉली ची पाहनी केली
त्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे दिसुन आले. त्यावेळी त्या ट्रॅक्टर चालक याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव


राजकुमार प्रभाकर कडु वय 43 वर्ष, रा. तारासावंगा, ता आष्टी जि.वर्धा

असे सांगीतले. ट्रॅक्टर चालकास सदर रेतीची वाहतुक परवानाबाबत विचारले असता त्याने कोणतेही परवाना नसल्याचे सांगितले तसेच ट्रॅक्टर मालक स्वतः असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष सदर ट्रक्टरची पाहनी केली असता

1) एक ब्रास वाळु कि. 3000 रु.
2) ट्रॅक्टरचा क्रमांक एम एच 32 ए एस 2615,असे असुन जिची किंमत रू 5,00,000 रूपये,
3) लाल रंगाची बिना नंबरची ट्रॉली किंमत रू 50,000 असा एकुण की. 5,53,000 रु.चा. मुद्देमाल मिळुन आल्याने ट्रक्टर व ट्रॉली सह वाळुचा पंचनामा दोन पंचासमक्ष करुन तसेच ट्रक्टर ट्रॉलीसह व चालकासह पो.स्टे आष्टी ट्रक्टर चालक आरोपी नामे राजकुमार प्रभाकर कडु वय 43 वर्ष रा. तारासावंगा ता.आष्टी जि. वर्धा यांनी स्वतःचे मालकीचा वर नमुद ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32 ए एस 2615 याचे मधुन, शासनाचा महसुल बुडवुन, मौजा तारासावंगा, परिसरातील कड नदीतुन एक ब्रास वाळु चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरूध्द अप.क्र. 29 / 2024 कलम कलम 379, भा. द.वी अन्वये गुन्ह्या नोंद करण्यात आला पुढील पुढील तपास पो.स्टे आष्टी करित आहे.


