अट्टल मोटारसायकल चोरट्यास वर्धा पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अट्टल मोटारसायकल चोरट्यास वर्धा पोलिसांनी केली अटक

वर्धा – सर्व पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. तपास करून सुद्धा गुन्हेगार हाती लागत नव्हता मात्र शेवटी याच गुन्ह्यातील एक अट्टल गुन्हेगार गेले अनेक दिवस गुंगारा देत होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.





या बद्दल अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी राजेंद्र श्रिहरराव फलके (वय ५१ वर्ष), रा.सिंदी (मेघे), मातोश्री वृध्दाश्रम जवळ, वर्धा हे त्याचे जवळील हिरो होन्डा पॅशन प्लस मोटर सायकल क्र. एम.एच. ३२ एम.५३५२ ही त्यांचा मुलगा पुणे येथे शिकत असल्याने त्याचे वापराकरीता सदर मोटर सायकल रेल्वे ने पुणे येथे पाठविण्याकरीता दिंनाक १८/९/२३ रोजी दुपारी ०२/०० वा दरम्यान वर्धा रेल्वे स्टेशन येथे जाउन त्याची मोटर सायकल रेल्वे स्टेशन समोरील एम.एस.ई.बी. कार्यालयाचे गेट जवळ उभी करुन रेल्वे टिकीट बुकिंग फॉर्म भरनेकरीता रेल्वे टिकीट कार्यालय, वर्धा येथे जाउन फॉर्म भरुन दुपारी ०२/३० वा दरम्यान परत गाडी जवळ आले असता ठेवलेल्या ठिकानी गाडी दिसली नाही. सदरची मोटर सायकल अज्ञात चोरट्यने चोरुन नेल्याचे त्याचे लक्षात आल्याने त्यांनी पो.स्टे. वर्धा (शहर) येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप. क्र. ११८८/२३ कलम ३७९ भादवी प्रमाने गुन्हा नोद करण्यात आला होता.



स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे वर्धा (शहर), सांवगी (मेघे), रामनगर परिसरात होत असलेल्या वारंवार मोटर सायकल चोरीचे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना आज दिनांक ०३/१२/२३ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे केळझर त. सेलु जि. वर्धा येथे जाउन एक ईसम त्याचे ताब्यातील एक जुनी वापरती मोटार सायकल विक्री करीता संशयास्पद रित्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेउन सखोल विचारपुस केली असता त्याने वर्धा (शहर), रामनगर, सावंगी (मेघे), तसेच धंतोली नागपुर, वरोरा जिल्हा चंद्रपुर येथुन वेगवेगळ्या चावीचे साह्याने मोटर सायकल चोरी केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन १,८५,०००/- रु च्या ९ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या. आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्याचे कडुन ईतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.



अशा प्रकारे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशा प्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनिष कांबळे, पवन पन्नासे, प्रदिप वाघ, शिवकुमार परदेशी, व अखील इंगळे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा.यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!