
विदेशी दारुची चिल्लर विक्रीकरीता वाहतुक करणारा दुचाकीसह हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात….
चिल्लर विक्रीकरीता विदेशी दारु अवैधरित्या बाळगणार्यास हिंगणघाट डि बी पथकाने घेतले ताब्यात…..
हिंगणघाट(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे प्राप्त आदेशान्वये सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे उद्देशाने ठाणेदार हिंगणघाट पोलिस निरीक्षक देवेन्द्र चव्हान यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डी बी पथकास योग्य त्या सुचना देऊन रवाना केले त्यानुसार दि. 21/07/2025 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, एक इसम मोपेड गाडीने दारूचा माल घेवून जाम कडून रिमडोह मार्ग हिंगणघाट कडे वाहतूक करून घेवून येत आहे,


अशा खात्रीशीर माहितीवरुन सदरची माहीती पोलिस निरीक्षक देवेद्र ठाकुर यांना देवून त्याचे आदेशाने रिमडोह सव्हीस रोड, हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून नाकाबंदी केली असता नाकेबंदी दरम्यान एक इसम मोपेड गाडीने येतांना दिसल्याने पोलिस स्टाँफचे मदतीने सदर मोपेड गाडीला थांबवून सदर ईसम सागर खुशाल गायकवाड वय 28 वर्ष रा. वीर भगतसिंग वार्ड हिंगणघाट जि. वर्धा याचे गाडीच्या पायदाणावरील बॅग ची पाहणी केली असता बॅगमध्ये 1) रॉयल स्टॅग कंपनीचे दोन लिटरचे चार बंपर किंमत साडेतीन हजार रुपये प्रमाणे 14,000/रु ,2) मोरपंखी रंगाची जुपिटर zx क्र. MH 32 AQ9414 किं. 90,000/- रू असा एकुन .किं. 1,04,000/- रू चा माल अवैदयरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करण्यात आला.तसेच सदर कार्यवाही मधील आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हिंगणघाट देवेद्र ठाकुर यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राजेश शेंडे, पोशि आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहीत साठे यांनी केली.



