
सम्रुध्दी महामार्गावर ट्रॅव्हल्स मधुन दागिण्यांची चोरी करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….
समृद्धी महामार्गावर झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघड करून बाहेर राज्यातील आरोपी निष्पन्न करुन त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे कि. 7,94236/-रु चा मुद्देमाल केला जप्त…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी ही दिनांक 21/03/2025 रोजी तिचे आई- वडील व दोन मुलांसह पुणे वरुन नागपूर येथे ट्रॅव्हल्स ने जात असता समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्यातील विरूळ पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल्स थांबली असता फिर्यादी हिचे आई-वडिल हे बाथरूम करीता गेल्याचे पाहून त्यांच्या सीटवर ठेवून असलेल्या बॅगमधुन अज्ञात आरोपीने 1) एक सोन्याचे पदक व काळे मणी असलेले मंगळसूत्र, 2) एक पिवळा धातूचा पोहेहार, 3)एक सोन्याचे पदक व काळे मणी असलेले मंगळसूत्र, 4) दोन पिवळा धातूचे झुंबर, 5) दोन पिवळा धातूच्या रिंग कि. 3,42,000/- चा माल* चोरी करुन नेल्यावरुन फिर्यादी हिचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमांक. 229/2025 कलम 305(C), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासावर आहे.


सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना खबरी कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरचा गुन्हा हा खैरवा, जिल्हा – धार, राज्य – मध्य प्रदेश येथील आरोपी दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान वय 34 वर्ष, रा. खैरवा (जहागीर), पोस्ट कुवाद, थाना – मनावर, जिल्हा – धार, राज्य – मध्य प्रदेश ने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस चित्रदुर्ग, राज्य कर्नाटक जेल मधून ताब्यात घेन्यात आले.सदर गुन्हयातील आरोपीस विचारपू करुन त्याने चोरी केलेले 1) एक सोन्याचे पदक व काळे मणी असलेले मंगळसूत्र वजन 53.420 ग्रॅम किं. 4,45,280/- रू, 2) एक पिवळा धातूचा पोहेहार वजन 11.220 ग्रॅम किं. 1,03,224/- रू, 3)एक सोन्याचे पदक व काळे मणी असलेले मंगळसूत्र वजन 25.300 ग्रॅम किं. 1,77,560/- रू, 4) दोन पिवळा धातूचे झुंबर व रटॉप्स वजन 6.810 ग्रॅम किं. 62,652/- रू 5) दोन पिवळा धातूच्या रिंग वजन 0.600 ग्रॅम किं. 5,520/- रू, *जु.कि. 7,94236/- चा** मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.उपनि. सदानंद वडतकर, पोलिस स्टेशन पुलगाव हे करीत आहे.

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उप.नि. राहुल इटेकर, सदानंद वडतकर, स.फौ. संतोष दरगुडे, पो.हवा. धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, अक्षय राऊत, पवन पन्नासे, अमोल बरडे,अतुल भोयर, मोहम्मद गौरवे, हर्षल सोनटक्के यांनी केली.



