अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त…..

देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी विशेष पथकास दिले होते





त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन देवळी हद्दीत आजंती घाट परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना  मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून  विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलिस स्टेशन देवळी हद्दीतील आजंती घाट येथे अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्यावर छापा कार्यवाही केली असता तिथे १) एक नवीन लाल रंगाचा महिंद्रा ५७५ DI SP PLUS कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-३२ / AH – ८४९६ किंमत ६,00,000/-₹ व एक लाल रंगाची राज कंपनीची ट्रॉली क्रमांक MH- ३२ / TC-०२६ किंमत १,00,000/-₹ व ट्रॉली मध्ये १ ब्रास रेती किंमत ९०००/-₹ असे मिळून आल्याने आरोपी १) मालक – अंकित अशोकराव टेकाडे, वय २८ वर्ष रा.वॉर्ड क्र. १ बकाने ले-आऊट, देवळी, २) चालक – प्रकाश पुरुषोततम भिडिकर, वय ४७ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १६ इंदिरानगर, देवळी यांचे विरुध्द पोलिस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार  कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर,पोलिस
अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलिस स्टेशन देवळी येथील पोलिस स्टॉफ यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!