
SDPO वर्धा यांचे पथकानी पकडला चिल्लर विक्कीसाठी जाणारा दारुचा मुद्देमाल…
नाकाबंदी करुन पकडला देशी विदेशी दारुचा माल चिल्लर विक्रीसाठी बाळगणारा उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचे ताब्यात….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथक वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 28.03.2024 रोजी गोपनिय माहीती वरुन पुलफैल वर्धा येथे नाकेबंदी करून 1) सुदर्शन उर्फ ददया सुनील जवादे वय 24 वर्ष रा. दिग्रस ता. जि. वर्धा ह.मु. दिव्यरंभ बुध्द विहार जवळ, पुलफैल, वर्धा 2) सनी उर्फ विक्की सुनील गोडांने वय
25 वर्ष रा.वार्ड न. 26 पुलफैल, वर्धा यांचेवर रेड केला असता यांचे ताब्यातुन 1) एक ग्रे रंगाची सुजुकी कंपनीची बर्गमॅन दुचाकी मोपेड वाहन क्रमांक एम.एच. 32 ए.यु. 4107 त्या मोपेडवर दोघाचे मधे खरडयाचे खोक्या मध्ये व कापडी पिशवी मध्ये वेगवेगळया कंपनीच्या 2) 180 एम. एल. च्या ऑफीसर चॅाईस कंपनीच्या शिश्या 3 ) 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या एका खरडयाचे खोक्यात टुबर्ग स्टॉग 3) 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या एका खरडयाचे खोक्यात कासबर्ग असा एकुण जु. किंमत 1,24,900/- रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात
आला
सदर आरोपींना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की सदर विदेशी दारूचा माल हा सावंगी आसोला जि. नागपुर हायवे रोडवरील Leopold-9 नावाने असलेल्या रेस्टॉरेन्ट व बार चे चालक / मालक अभिषेक चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि. नागपुर यांचे बार मधुन
आणला आहे. असे सांगीतल्याने अभिषेक चिंतलवार यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपींना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात बार मालक यास आरोपी बनविण्यात आले आहे.त्यावरुन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरूध्द 1 ) अपराध क्रमांक 528 / 2024 कलम 65 अ ई.77 अ, 82, 83, म.दा.का. सहकलम 3(1)181,130 / 177 मो. वा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.
स्टे. वर्धा शहर करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर याचे विशेष मार्गदर्शनाखाली पो.उप.
नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख यांनी केली




