पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने देवळी येथे पकडला मोठा दारुसाठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण १२,९७,६००/- रु. चा-विदेशी दारूचा सांठा केला जप्त….

देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी रात्री पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक पुलगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरी द्वारे गोपनीय बातमी मिळाली एका चारचाकी वाहनांत (Walkswagan Vento Sedan) मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा अमरावतीहून पुलगाव मार्गे देवळी येथे येत आहे अशा खात्रीशीर माहीतीवरुन विशेष पथकाने देवळी येथील राम मंदीरा जवळ पथकाने सापळा रचुन नाकाबंदी केली असता पहाटे ३.०० वा चे सुमारास मिळालेल्या माहिती नुसार एक चारचाकी गाडी (Walkswagan Vento Sedan) येताना दिसताच पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाहनास थांबवुन
चारचाकी वाहन ( Walkswagan Vento Sedan) क्र. MH – ०२ / BT-५२४९ हे मिळुन आल्याने सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये १) एकूण १९ खाकी खोक्यामधे १८० ml चे ओ सी ब्ल्यू कंपनीचे व्हिस्की ने भरलेले ९१२ बॉटल्स प्रती किंमत ३००/-₹ प्रमाणे किंमत २,७३,६०० /₹, २) दोन खाकी खोख्यामधे १८० ml चे ऑफिसर चॉईस कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या ९६ बॉटल्स कि  २४,०००/-₹, चा विदेशी दारुसाठा मिळुन आला





तसेच वाहन चालक चालक मंगेश प्रकाश पाटमाशी वय 30 वर्षे रा. इंदिरा नगर वार्ड नं. १७ देवळी यास ताब्यात घेवुन त्यास विचारपूस केली असता तो त्याचा मालक २) गजानन पाटणकर वय ४० वर्षे, ३) विक्की पाटणकर वय 39 वर्षे दोन्हीं रा. देवळी यांचे करीता काम करीत असल्याचे सांगितले व सदरचा दारुसाठा हा त्याने अंकित जयस्वाल, रा. वर्धा याचे ग्राम विटाळा, जि. अमरावती येथील बार मधुन आणल्याचे सांगितले. वरील वाहनात मिळुन आलेला १) एकूण १९ खाकी खोक्या मधे १८० ml चे ओ सी ब्ल्यू कंपनीचे व्हिस्की ने भरलेले ९१२ बॉटल्स प्रती किंमत ३००/-₹ प्रमाणे किंमत
२,७३,६००/-₹, २) दोन खाकी खोख्या मधे १८० ml चे ऑफिसर चॉईस कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या ९६ बॉटल्स किंमत २४,०००/-₹, ३) एक Walkswagan Vento Sedan car क्र MH-०२/BT-५२४९ किंमत १०,००,०००/-₹ असा एकुण १२,९७,६०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक, मालक व बार मालकाविरुध्द पोलिस स्टेशन देवळी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर, पोलिस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस स्टॉफ यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!