हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व दारु माफीया गुठली भगत यास MPDA कायद्यान्वये केले जेलबंद
हिंगणघाट(वर्धा) – आगामी सनांच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगार व अवैध दारु विक्रेता
दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट
याचेविरुध्द भारतीय दंड विधान, भारतीय हत्यार कायदा तसेच दारुबंदी कायदा अन्वये त्याचेविरुध्द सन २०१६ पासुन २०२३ पावेतो एकुण १९ गुन्हे पोलिस स्टेशन हिंगणघाटचे अभिलेखावर नोंद आहेत. ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगुण धामधुम करणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन जिवघेणा हल्ला करणे यासारखे
गंभीर गुन्हे करण्याचे सवयीचा गुन्हेगार आहे., दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत याचे विरुध्द सन २०१७ मध्ये तडीपार कारवाई करण्यात आली होती. तसेच वेळोवेळी प्रचलीत कायद्यान्वये प्रतीबंधक कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली होती. परंतु कायदेशिररित्या करण्यात आलेल्या प्रतीबंधक कार्यवाहीला न जुमानता त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम सुरु ठेवुन पोलिस स्टेशन हिंगणघाट परीसरात दहशत निर्माण केली होती. या स्थानबध्दाने नुकताच जबरी चोरीचा गुन्हा सुध्दा केला होता. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्याकरीता महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. सदरहु प्रस्तावाचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल घेवुन स्थानबध्द दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर संत तुकडोजी वार्ड,
हिंगणघाट याचा दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानबध्द आदेश जारी केला व त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर
येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सन २०२३ या वर्षात अद्याप पावेतो एकुण ८ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत कार्यवाही करुन स्थानबध्द करण्यात आलेले आहे. एम. पी.डी.ए. सारख्या कठोर प्रतीबंधक कार्यवाहीमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या मनात धडकी भरलेली आहे. भविष्यात सुध्दा वर्धा जिल्ह्यातील अशाच प्रकारच्या शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते अश्या गुन्हेगारांवर उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी प्रतीबंधक कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा, पोलिस निरीक्षक मारोती मुळुक, पो.स्टे. हिंगणघाट, पोहवा. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, सचिन इंगोले स्था.गु.शा. वर्धा पो.ना. प्रशांत भाईमारे, आशिष मेश्राम, सुनिल मेंढे, पो.स्टे. हिंगणघाट यांनी केली.