वाळुमाफियांवर कारंजा पोलिसांची मोठी कार्यवाही,१.६१ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त….
कारंजा(घा)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की नदीपात्रातून अवैधरित्या वाळुचे उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. अशी गुप्त माहीती कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाढे यांना प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर राजनी शिवारात नाकाबंदी केली असता ४ डंपर ट्रक याची तपासनी केली त्यातुन हे छत्तीसगड येथुन अमरावती येथे जात असल्याचे सांगितले वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये रॉयल्टीत नमुद वाळुपेक्षा अधिक प्रमाणात वाळु आढळून आली. याप्रकरणी चार डंपर चालकांसह क्लिनर यांना अटक करण्यात आली आहे. रेतीघाट मालक, डंपर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.असुन कारंजा येथील राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळुची वाहतूक होत असुन नमुद डंपरची चौकशी केली असता तीन डंपरमधील वाळुची रॉयल्टी त्यांनी दाखविली. मात्र चौथ्या डंपर विनारॉयल्टी वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. पहिल्या डंपरमध्ये 40 लाख 70 हजार, दुसऱ्या डंपरमध्ये 40 लाख 15 हजार, तिसऱ्या डंपरमध्ये 40 लाख 30 हजार, चौथ्या डंपरमध्ये 40 लाख 60 हजार अठरा ब्रास वाळुसाठा, असा एकूण 1 कोटी 61 लाख 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या पुर्वीही पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी रेतीमाफीयांमध्ये ज्यांचा हातखंडा आहे. अशा लोकांवर हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी येथील रेतीसाठ्यांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. मात्र प्रकरण महसूलच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने पुढे कारवाई थंडावली.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे. उपविभागीय पोलिस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा येथील ठाणेदार सुनील गाढे, सफौ निलेश मुंडे, लिलाधर उकंडे. नापोशि नितेश वैद्य निलेश मंडारी पोशि दिनेश घसाट, अमरदीप वाडवे, अंकुश रामटेके, चालक समाधान पांडे ,प्रदुम्न फड यांनी केली. पुढील तपास सुरु आहे