शेतमाल विकुन घरी परतत असतांना,विक्रीतून मिळालेले पैसे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचेकडुन पोलिस स्टेशन,आर्वी येथील गरीब शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीचे पैसे बसस्थानक येथिल गर्दीचा फायदा घेवुन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेवुन गरीब शेतकऱ्याला पैसे परत मिळवुन दिले….
आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  पांडुरंग चिधुंजी ठाकरे, वय 63 वर्ष, धंदा-शेती, रा. तरोडा, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी दिनांक 02.12.2023 रोजी लेखी तक्रार दिली की, दिनांक 02.12.
2023 रोजी दुपारी शेतातील 18 क्विटंल 67 किलो सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथे विकुन सोयाबीन विक्रीचे नगदी 75,000/- रू. पॅन्टचे उजवे खिश्यामध्ये ठेवुन गावी जाण्याकरीता
आर्वी बसस्टॅन्ड येथे पोहचलो असता तेव्हा पैसे खिश्यात होते नंतर आर्वी हिंगणघाट बस लागल्याने बसमधे चढत असतांना गर्दी होती बसमध्ये चढल्यानंतर पॅन्टचे खिश्याला हात लावला असता खिश्यातील पैसे दिसुन आले नाही पॅन्टचे खिश्यात ठेवुन असलेले नगदी अदांजे 75,000/- रू. कोणीतरी अज्ञात इसमाने बस स्टॅन्डचे गर्दीत खिश्यातुन चोरून नेले आहे अशा लेखी तक्रार वरुन पोलिस स्टेशन,आर्वी जि. वर्धा येथे अप.क्र. 1340 / 23 कलम 379 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गरीब शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवुन देण्याकरीता पोलिस अधीक्षक नूरुल हसन  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना त्वरीत सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देशित केल्याने गुन्हयातील
आरोपी शोधकामी एक अधिकारी व टिम रवाना करून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयाचे अनुषंगाने आर्वी बसस्थानक परिसरातील तसेच
आर्वी, तळेगाव, तिवसा, कुन्हा, अमरावती, पुलगाव रोडवरील फुटेजचे बारकाईने अवलोकन करून दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन सदरची चोरी हि अमरावती व बडनेरा येथील गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणारे अटट्ल गुन्हेगार

1 ) अब्दुल अतीक अब्दुल रफीक, वय 32 वर्ष, रा. अलीमनगर गल्ली न. 03, अमरावती जि. अमरावती



2) शेख सलीम शेख युसुफ, वय 32 वर्ष,



3) सैय्यद आकीब सैय्यद अफसर, वय 23 वर्ष, रा. गढढा मैदान जुनीवस्ती बडनेरा, जि. अमरावती





यांना कसुन विचारपुस केली असता त्यांनी संगणमताने वर्धा जिल्हयातील आर्वी येथे बसस्टॅन्डवर बसमधे चढत असलेल्या गर्दीत एका इसमाचे खिश्यातील पैसे काढुन चोरी केल्याबाबत कबुल केल्याने तिन्ही आरोपी यांचे ताब्यातुन

1 ) नगदी रोख 65,000/- रू.

2) गुन्हा करतेवेळी वापरलेली बजाज पल्सर एनएस 125 मोटार सायकल तसेच

3) तिन्ही आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेले मोबाईल असा एकुण कि. 2,15,000/- रू. चा मुददेमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  नूरुल हसन,. अपर पोलिस
अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, पोलिस निरीक्षक . संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. संतोष दरेकर, पोलिस अमलदार मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक, दिनेश बोथकर, अक्षय राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!