
शिखबेडा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
सांवगी मेघे हद्दीत शिखबेडा येथील जुगारावर LCB चे पथकाचा छापा,15 आरोपींसह 7,23,230/- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत….
सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 10/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ची पथके पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सावंगी परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गोपणिय माहितीवरून सांवगी मेघे शिखबेडा येथे गुरूव्दाराजवळ राहणारा ईसम राजकुमार बावरी हा 52 तास पत्त्यावर चेंगड जुगार अंदर बाहर असा पैशाची पैज लावुन स्वतःचे फायदयाकरीता खेळवत असल्याचे माहितीवरून त्याचेवर जुगार रेड कारवाई केली असता मोक्यावरून ईसम राजकुमार बावरी हा जुगारी लोकांच्या गर्दीतुन पसार झाला पंचासमक्ष 08 जुगारी ईसम व 07 मोटर सायकलचे
जुगारी चालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 72,080 रू, मोबाईल 05, मोटर सायकल व मोपेड गाडया एकुण 09, 52 तास पत्ते, चेंगडचे छापील बॅनर असा एकुण किंमत
7,23,230/- रूपयेचा मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) राजकुमार बेतनसिंग बावरी, रा. शिखबेडा सावगी मेघे, वर्धा 2) संघपाल इंद्रपाल डंभारे, वय 25 वर्ष रा. समतानगर, वर्धा, 3) राकेश रामलखन यादव वय 39 वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा 4) गोकुळ बबनराव शेंडे वय 28 वर्ष रा. समतानगर, वर्धा, 5) रियाज शेख फारूख शेख वय 28 वर्ष रा. महादेवपुरा वर्धा, शुभम सतीश रेवडे, वय 24 वर्ष रा. गिटटीखदान सावंगी मेघे वर्धा, 7) दामुजी गणुजी पंडीत वय 70 वर्ष, रा. गिटटीखदान सावगी वर्धा 8) अजीज खान कचरू खान वय 65 वर्ष रा. डेहनकर ले आउट, साईनगर नागठाणा वर्धा, 9)मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 डब्ल्यु 7795 अॅक्टीव्हा गाडीचा चालक, 10) मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए टी 5074 सुझुकी अॅसेस गाडीचा चालक, 11) मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए एम 2794 अॅक्टीव्हा गाडीचा चालक, 12) मोटर सायकल गाडी क्रमांक एम एच 32 ए डी 4491 स्पेल्डर गाडीचा चालक, 13) मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए टी 7464 सुझुकी एसेस गाडीचा चालक, 14) मोटर सायकल गाडी क्रमांक एम एच 32 यु 8288 स्पेल्डर गाडीचा चालक, 15) मोटर सायकल गाडी क्रमांक
एम एच 32 ए सी 1923 सुझुकी गिक्सर गाडीचा चालक हे संगणमताने आरोपी राजकुमार बावरी याचे घराचे मागील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी 52 तास पत्त्यावर पैश्याची पैज लावुन मांग पत्त्याचा, अंदर बाहर असा चेंगड जुगार स्वतःचे फायदयाकरीता खेळत असतांना मिळुन आल्याने त्याचे कृत्य कलम 12 महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा होत असल्याने त्याचेविरूध्द पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई नूरुल हसन पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे अपर
पोलिस अधिक्षक, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे
मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक उमाकात राठोड, अमोल लगड, सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येनुरकर, नरेद्र पाराशर, चंद्रकात बुरंगे, पवन पन्नासे, भुषण निघोट, महादेव सानप,
राजेश तिवसकर, रितेश शर्मा, नापोशि मनिष कांबळे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, मंगेश आदे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.




