
नाकाबंदी दरम्यान स्थागुशा पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत पकडला देशी विदेशी दारुचा साठा…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्देटेशन देवळी हद्दीत नाकाबंदी दरम्यान जप्त केला देशी विदेशी दारुसह 3,29,400/- मुद्देमाल…
देवळी(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक १२/०१/२०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहीतीनुसार एक ईसम देशी विदेशी दारुची वाहतुक करणार असल्याचे खात्रीशीर माहीतीवरुन पोलिस स्टेशन देवळी हद्दीत भीडी येथे नाकाबंदी करुन


1) अजय अनंता नागपुरे वय 19 वर्ष रा. वॉर्ड नं 1, वायगाव (नी) ता. जि. वर्धा
2) सविधान संदीप मस्के वय 20 वर्ष, रा.वॉर्ड नं 1, वायगाव (नी) ता. जि. वर्धा

यांना Pigio appe या वाहनांतील गाडीच्या मागच्या डाल्या मध्ये

1) दहा खर्ड्याच्या खोक्यामध्ये सिमला संत्रा कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 180 ml च्या सिलबंद 479 बाटल्या. किं 95,800/- रु.
2)एका खर्ड्याच्या खोक्यामध्ये RS कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 180 ml च्या सिलबंद 48 बाटल्या किं. 16,800/- रू
3) एका खर्ड्याच्या खोक्यामध्ये OC BLUE कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 180 ml च्या सिलबंद 48 बाटल्या किं 16,800/- रू
4) एक जुना वापरता PIAGGIO ape कंपनीचा ऑटो क्र. MH. 32.Q.4816 किं.2,00,000/-रु असा एकुन विदेशी व देशी दारू वाहनासह एकुन किंमत .3,29,400/- रु. चा माल जप्त केला.सदर दारुमाल
आरोपी क्र. 3 – रिमझिम बार कळंब जि. यवतमाळ (बारमालक )(पसार) जो फरार आहे व सदरचा माल हा याचे बार मधुन आणल्याचे आरोपी क्र. 1 ने सांगितले वरून तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन देवळी येथे अप. क्र 26/ 2023कलम 65(ई)(अ),77(अ), 83 म.दा.का. सहकलम 3(1),181,130/177 मो.वा.का. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे , पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात संतोष दरगुडे, विकास अवचट, राकेश आष्टनकर, हर्षल सोनटक्के यांनी केली.


