वाहन चोरट्याच्या वर्धा पोलिसांनी आवळल्या मुसक्या,२ गुन्हे केले उघड…
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पोलिस स्टेशन , तळेगाव व आर्वी येथिल कार आणि मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटयास ताब्यात घेवुन चोरी गेलेली मारूती कपंनीची झेन कार व एक मोटार सायकल अवघ्या चार तासात हस्तगत करून दोन गुन्हे केले उघड…..
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, सतनामसिंग लेहरीसिंग अंधरेलेबावरे, वय 33 वर्ष, रा. वर्धामनेरी यांनी लेखी तक्रार दिली की दिनांक 14.12.2023 रोजी रात्री मारुती सुजुकी कपंनीची झेन कार क्र. एम. एच. 31 – सिएन – 3599 हि घरासमोर उभी करून रात्री 10.00 वा. दरम्यान जेवण करून झोपी गेले असता पहाटे 04.00 वा. दरम्यान बाथरूमकरीता उठले तर घरासमोर ठेवुन
असलेली झेन कार त्यांना दिसुन आली नाही गावात शोध घेतला परंतु कुठेच न सापडल्याने दिनांक 14.12.2023 चे 10.00 वा. ते दि. 15.12.2023 चे 04.00 वा.दरम्यान झेन कार अज्ञाताने चोरून नेली अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन तळेगाव शा.पं. येथे 690 / 23 कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद झाला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना त्वरीत सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देशित केल्याने गुन्हयातील आरोपी शोधकामी एक अधिकारी व टिम रवाना करून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयाचे अनुषंगाने तळेगाव, आर्वी कारंजा, तिवसा रोडवरील सिसिटिव्ही फुटेज चे बारकाईने अवलोकन करून
दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन गुप्त माहिती मिळाली की सदर कारने एक संशईत तळेगाव ते सारवाडी रोडवर सशंयीतरित्या फिरत आहे अशा माहितीवरून सदर कार चालक करण किसन
चव्हाण, वय 24 वर्ष, रा. पुसागोंदी, ता. काटोल जि. नागपुर यास ताब्यात घेवुन त्यास कसुन विचारपुस केली असता त्याने सदर कार हि वर्धामनेरी येथुन चोरी केल्याचे कबुल केले तसेच एक मोटार सायकल हि आर्वी येथुन रात्र दरम्यान चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याचे ताब्यातुन
1 ) मारूती सुझुकी कपंनीची झेन कार क्र. MH-31 – CN- 3599 किमंत 1,30,000/-रू.
2) हिरोस्प्लेन्डर मोटर सायकल क्र. MH-31-EW-2469 कि. 25,000/- रू.
3) एक आयटेल कपंनीचा मोबाईल कि. 10,000/- असा एकुन 1,65,000/- रू.
चा. मुददेमाल हस्तगत करून पोलिस स्टेशन तळेगाव व पो.स्टे. आर्वी येथिल असे दोन गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. संतोष दरेकर, पोलिस अमलदार मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद
कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.