
पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…
वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची तपासणी केली असता, कार व मोपेड मध्ये खाली नमुद प्रमाणे देशी – विदेशी दारूचा माल अवैधरित्या बाळगून त्याची वाहतूक करतांना मिळून आल्याने पंचासमक्ष मोक्यावरून कार सह किंमत 7,75,300/- रु. चा माल जप्त केला. तसेच
1) कोहिनूर संजय उके, वय 24 वर्ष, रा:- भिम नगर वर्धा
2) आयुष पुरुषोत्तम वावरे वय 20 वर्षरा:- बोरगाव टेकडी वर्धा
3) यश चंद्रशेखर देवगडे वय रा. समता नगर वर्धा
4) दर्शन हरिभाऊ फुंदे वय 23 वर्ष रा:- गणेश नगर वर्धा
5) मुकेश जयस्वाल रा. विठाळा *बारमालक*. (फरार)
सदर दारुमाल आरोपी क्रमांक पाच याचे कडून विकत घेतल्याचे आरोपी क्रमांक एक ने सांगितले वरून नमूद पाचही आरोपींविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. असुन आरोपी क्रमांक एक ते चार यांची शारीरिक तपासणी करून त्यांना अटक केली


1) टैंगो कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 90 ml च्या एकूण 800 सीलबंद शिशा किं.80,000 /- रु.
2) 3 खर्ड्याच्या खोक्यामध्ये विदेशी दारूने भरलेल्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 144 सीलबंद शिशा किं. 43,200/- रु.
3) टॅंगो कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 90 ml च्या सिलबंद 300 शिशा किं. 30,000/- रु.
4) एका प्लॅस्टिक पिशवी मध्ये विदेशी दारूने भरलेल्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 61 सीलबंद शिशा किं 18,300/- रू

5) किंगफिशर कंपनी च्या 500Ml च्या बियर च्या 24 टिनाचे डब्बे कि 8,400/- रू
6) टुबर्ग कंपनी च्या 650Ml च्या बियर च्या 12 काचेच्या शीश्या कि 5,400/- रू
7) एक मारोती सुझुकी स्विफ्ट कार क्र. MH-13/AX/1866 किं.5,00,000/- रु.
8) एक जुनी वापरती NTORQ मोपेड कि 90,000/- रू
*जु. किं. 7,75,300/- रु. चा माल*

वरील जप्त मुद्देमाल पोस्टे वर्धा शहर याचे ताब्यात देण्यात आला
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन , अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर कवडे यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा मार्गदर्शनात पोलिस अंमलदार संतोष दरगुडे ,गजानन लामसे ,राजेश तिवस्कर, राकेश अष्टेकर, यशवंत गोल्हर,गोपाल बावनकर,संघसेन कांबळे,रितेश वर्मा,अक्षय राऊत यांनी केली


