पोलिस अधिक्षकांचे दारुविरुध्द विशेष अभियान, पुन्हा SDPO वर्धा यांचे पथकाचा दारुची विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर नाकाबंदी दरम्यान छापा…

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २६/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान मानमोडे लेआउट जुनापाणी चौक वर्धा येथे नाकाबंदी केली असता एक चारचाकी  मारोती सुजुकी कंपनीची स्विफ्ट एम.एच. ३२ सी. ६८५३ पांढरे रंगाची ही येतांना दिसली सदर वाहनास थांबवुन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव





मयुर प्रकाश मंद्रीले वय 24 वर्ष रा. स्नेहल नगर वर्धा



असे सांगितले त्याचे गाडीची तपासनी केली असता  त्यात



१) एक पांढरे  रंगाची मारोती सुजुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी अंदाजे किंमत ६,०००००/- रुपये

२) १८० एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॅायल स्टॅग (आर.एस) कंपनिच्या ३ खरड्याचे  पुर्ण खोक्यामध्ये एकुण ८४ बाटल्या प्रति नग ४००/-रू प्रमाणे एकुण ३३,६००/-रू.

३) १८० एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ओसी ब्ल्यू कंपनिच्या 3 खरड्याचे  पुर्ण खोक्यामध्ये एकुण १४४ बाटल्या प्रति नग ३५०/-रू प्रमाणे एकुण ५०,४००/-रू.

४) १८० एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ॲाफीसर चॅाईस कंपनिच्या ३ खरड्याचे  खोक्यामध्ये एकुण १५६ बाटल्या प्रति नग ३००/-रू प्रमाणे एकुण ४६,८००/-रू.

5) ९० एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या टांगो कंपनीच्या ३ खरड्याचे  खोक्यामध्ये एकुण ३००  बाटल्या प्रति नग ८०/-रू प्रमाणे एकुण २४,०००/-रू.

६) एक मोबाईल की. १,0000/- रू असा एकुण किंमत ७,६४,८००/-रू. चा माल मिळुन आला.

आरोपी –

१) मयुर प्रकाश मंद्रीले वय 24 वर्ष रा. स्नेहल नगर वर्धा

२) अभय भामोरे रा. अमरावती (फरार)

यांचे विरोधात पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र 1006/2023  कलम 65 अ ई, 77 अ, 82 83, म.दा.का.सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करुन रामनगर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, यांचे आदेशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे,पोलिस शिपाई पवन निलेकर,मंगेश चावरे,समीर शेख यांनी केली

सदर गुन्हयात एकुन ७,६४,८००/-रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करून पोलिस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!