दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिवसा घरफोडीचे गुन्हे करणारी  आंतरराज्यीय, अंतर जिल्हा टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघड….

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात घडणारे संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार राबविल्या जात आहेत त्याकरीता सतत पेट्रोलींग, वेळोवेळी ऑपरेशन ऑल आउट, कोंबीग ऑपरेशन व नाकाबंदी सारख्या विशेष माहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवुन आरोपींविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाहया करण्यात आल्या. परीनामी मागील काही वर्षाचे तुलनेत गुन्हयांमध्ये घट आली आहे.





तसेच मालमत्तेचे गुन्हे घडलेच तर घडलेल्या गुन्हयांना उघडकीस आणण्यावर भर दिला गेला. त्याकरीता योजना आखल्या विशेष प्रयत्न केले, केलेले सर्व प्रयत्नांचा अहवाल मागवुन सतत आढावा घेतला. संपत्तीविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेला सुचना/आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने घडलेल्या गुन्हयांच्या तांत्रीक बाबी तपासुन विश्लेषनात्मक अभ्यास करुन. गुन्हेगारांचे रेकॉर्ड, सिसिटीव्ही फुटेज बघुन आरोपींनी घरफोडीकरीता वापरलेल्या पध्दतींचा अभ्यास करुन त्यावरुन असे लक्षात आले की, बुलढाणा जिल्हयातील विशिष्ठ भागातील घरफोडीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या टोळया वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, बिड, नाशिक, जळगाव, चाळीसगाव असे महाराष्ट्रातील व मध्यप्रदेश येथील काही जिल्हयांमध्ये सक्रीय आहे. त्यावरुन मागील दोन महिण्यापासुन घरफोडीचे गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवुन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवल्या जात होते. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सतत प्रयत्न चालुच होते.



त्यातच स्थानिक गुन्हे शाखेस दि.२४.०५.२०२५ रोजी घरफोडीचे गुन्हे करणारे आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार मालेगाव येथे येत असल्याच्या मिळालेल्या गोपणीय बातमीप्रमाणे अकोला नाका, मालेगाव येथे सापळा रचुन संशयीत इसम १) आकाश प्रकाश पवार वय ३५ वर्ष २) उमेश गटरंग पवार वय २८ वर्ष दोन्ही रा. फत्तेपुर, ता. खामगाव, जि. बुलढाणा यांना कमालीचे प्रयत्न करुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन वाशिम येथील अप.क्र. ११२/२५ अप.क्र. २३९/२५ अप.क्र. ४१७/२५ अप.क्र. ७५३/२४ पो.स्टे.रिसोड येथील अप.क्र. ५८१/२४ अप.क्र.१८५/२४ अप.क्र. ७६/२४ असे एकुण ०७ गुन्हे त्यांच्या इतर साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने आरोपींकडुन एकुण ५१.२७ ग्रॅम वजनाच्या ०४ सोन्याच्या लगड व १७ तोळे वजनाच्या ०३ चांदीच्या लगड व नगदी १६,०००/- रु असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



घरफोडीचे गुन्हे करणारे आंतरराज्य टोळीतील कुख्यात आरोपी पोलीसांनी पकडुन एकावेळी ०७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे व त्या गुन्हयांमधील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे ही वाशिम जिल्हा पोलीसांकरीता मोठया यशाची व अभिमानाची बाब आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुज तारे,अपर पोलिस अधिक्षक  लता फड, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी वाशिम नवदीप अग्रवाल, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सपोनि योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार विनोद सुर्वे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, आषिश बिडवे, अविनाश वाढे, शुभम चौधरी, दिपक घुगे, संतोष कंकाळ, संतोष वाघ यांनी सतत कार्यरत राहुन अथक परिश्रम घेवुन गोपनिय माहिती मिळवुन केलेल्या तांत्रीक तपासामुळेच गुन्हे उघडकीस आले आहेत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!