
महामार्गावर ट्रक थांबवुन त्यातील गव्हाची चोरी करणारे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने केला जबरी चोरीचा गुन्हा उघड आरोपीकडुन ६३०७८०/- लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत, नागरीकांच्या मालमतेचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव सतर्क असून पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी कर-याना अटक करुन त्यांचे कडुन ६,३०,७८०रु चा माल हस्तगत केला आहे….
वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे दि.१३.१२.२०२३ रोजी फिर्यादि चैनसिंग मंगुसिंग तवर वय ४० वर्ष रा. भालतपुरा ता. भिकनगांव जिल्हा खरगोट मध्यप्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे अप.क. ५३१/२०२३ कलम ३९४ भादवि अन्वये अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपासात स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीतीचे आधारे आज दि.१६.१२.२३ रोजी आरोपी रामदास अशोक धोगंडे वय २३ वर्ष रा. जांभरुन परांडे व आरोपी राहुल गजानन करवते वय २५ वर्ष रा. सिव्हील लाईन वाशीम यांनी ताब्यात घेवून त्यांना गुन्हा संबंधी विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली व गुन्हयात जबरीने चोरी केलेला माल गहु २७ कट्टे किंमत ३०,७८०/- रु व गुन्हयात वापरलेला ट्रॅक्टर किंमत ५,००,०००/- रु व एक मोटार सायकल प्लसर १,००,०००/- रु असा एकुण ६,३०,७८०/- रु चा माल हस्तगत करण्यात आला असुन यातील इतर ०२ आरोपी फरार आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलिस स्टेशन वाशीम ग्रामीण हे करीत असल्याने नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पोलिस स्टेशन वाशीम ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक अनुज तारे (भापोसे),अपर पोलिस अधिक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली,उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम सुनिल पुजारी पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथकातील सपोनि जगदिश बांगर, पोहवा गजानन अवगळे, गजानन झगरे, संतोष कंकाळ, प्रविण शिरसाट, पोलीस नाईक ज्ञानदेव भात्रे, गजानन गोटे, पोलिस शिपाई दिपक घुगे, शुभम चौधरी, चालक पोलिस नाईक स्वप्निल तुळजापुरे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली




