
वाशिम जिल्हा वाहतुक शाखा झाली हायटेक,बॅाडीकॅमेरा घालुन वाहतुक कर्मचारी दिसणार…
बॉडी कॅमेरा लाऊन वाहतुक नियमन करणार वाशिम वाहतुक पोलिस,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे उपस्थितीत जिल्हा वाहतुक शाखेत जिल्हा वाहतुक अंमलदार व अधिकारी यांना बॅाडीकॅमेराचे वाटप….
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तत्कालीन पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी यासंदर्भात पाठपुरावा व नियोजन केले होते, त्याच कार्यशैलीने व त्यांनी राबविलेले उपक्रम यांना पुढे नेण्याचे हेतुने विद्यमान पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे संकल्पनेतुन जिल्हा वाहतुक शाखा येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित करून त्यांचे हस्ते एकुण 87 बॉडी कॅमेराचे वाटप सुध्दा करण्यात आले
वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणेबाबत तसेच वाहतुक नियमन व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करीत असतांना होणारा वाद टाळण्याच्या हेतुने वाहतुक अंमलदार यांना बॉडी कॅमेरा देण्यात आले आहे. वाहतुक नियमन करीत असतांना वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास चालकाचे कृत्य बॉडी कॅमेरामध्ये टिपले जाणार आहे. त्यामुळे वाहतुक अंमलदार यांना
प्रभावीपणे कर्तव्य करणे सोईचे होणार आहे. तरी सर्व नागरिकांना, वाशिम पोलिस दला मार्फत आवाहन करण्यात येते की वाहन
चालवितांना वाहतुक नियमाचे उल्लंघण केल्यास व कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाल्यास बॉडी कॅमेराच्या माध्यामातुन जिल्हा वाहतुक शाखा, सर्व पोलिस स्टेशन वाशिम जिल्हा यांच्या वतीने
कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन धंदर, शहर वाहतुक शाखेचे विजय जाधव व जिल्हयातील सर्व ट्रफिक अंमदार हजर होते.




