मकोका सारख्या गंभीर कायद्यान्वये फरार असलेला आरोपी राहुल रंगा यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथील मकोका प्रकरणातील सात महिण्यांपासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…..

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६ जुन  २०२३ रोजी  फिर्यादी रमेश श्रावण मस्के वय ६१ वर्ष रा. जयविजय चौक, यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रार दिली कि, त्याला त्याचे पत्नीने फोन करुन त्यांचा मुलगा  रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के वय २८ वर्ष रा. जयविजय चौक,यवतमाळ याचा खुन झाल्याचे सांगीतले वरुन फिर्यादी हा शासकीय रुग्णालय, यवतमाळ येथे गेले असता त्यांचा मुलगा हा मृत अवस्थेत दिसला त्याचा खुन शिनु शिंदे ऊर्फ राहुल रंगा चित्तलवार व त्याचे ८ ते १० साथीदारांनी रोशन यास तु अक्षय राठोड गँगचे काम पाहु राहीला तु आमचे मधात येत आहे तुला खतम करून टाकु अशी धमकी दिली होती व ते नेहमी रोशनचा पाठलाग करीत होते. त्यांनी मृतक रोशन हयास हुंडई शोरुम जवळ नागपूर रोड, यवतमाळ येथे दिनांक २३.६.२०२३ रोजी रात्री दरम्यान चाकुने मानेवर, छातीवर, डोक्यावर वार करुन जिवाने ठार केले अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन  यवतमाळ शहर येथे अप.क्र.५०३ / २३ कलम ३०२,१४३,१४४,१४७, १४८, १४९,१२०ब,३६४, २०१ भादवि प्रमाणे नोंद गुन्हयातील आरोपींनी हा  गुन्हा संघटीत गुन्हेगारीतुन केलेला असल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अन्वये कलम वाढ करुन गुन्हयाचा तपास करण्यात आला होता. व मा. अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मंजुरी प्राप्त करुन गुन्हयात दोषारोपपत्र सुध्दा दाखल करण्यात आलेले होते परंतु गुन्हयातील आरोपी शेख रहीम ऊर्फ शेर अली मोती सैयद वय २४ वर्ष रा. इंदीरा नगर, यवतमाळ हा
गुन्हा घडल्या पासुन फरार राहत होता तेंव्हा पासुनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके आरोपीस अटक करण्या करीता त्याचे मागावर होते, परंतु आरोपी रहीम हा अटक टाळण्या करीता आपली वास्तव्याची ठिकाणे बदलवुन पोलिसांना गुंगारा देत होता अशातच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने कसोशीने प्रयत्न करुन नमुद आरोपी हा चंद्रपुर जिल्हयात वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त केली होती. दिनांक २६/०१/२०२४ रोजी आरोपी शेख रहीम ऊर्फ शेर अली मोती सैयद वय २४ वर्ष रा. इंदीरा नगर, यवतमाळ हा वरोरा येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करुन त्यास वरोरा येथून ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता प्रकरणाचे तपास अधिकारी सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस
अधिकारी, पुसद  पंकज अतुलकर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, पोलिस शिपाई बंडु डांगे, साजीद शेख, अजय डोळे, धनु श्रीरामे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी
यशस्वीरित्या पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!