
खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोने व त्यांचे अधिनीस्त पथकास दिल्या होत्या. वरुन स्था. गु.शा. कडील पथके अशा पाहीजे असलेल्या व फरार आरोपींचा शोध घेत असतांना पोलिस स्टेशन यवतमाळ(ग्रामिण) जि. यवतमाळ अप. क्र. 0631/2019 कलम 307, 325, 323, 147, 148, 149, 504, 506
भा.द.वी. चे पाहीजे असलेला आरोपी


कैलास दिपक गोहाडे वय 28 वर्षे रा. ग्राम किन्ही, ता. जि. यवतमाळ हा सदर गुन्हा दाखल तारखे पासुन तो त्याची अटक चुकवीत फरार असल्याने त्याचा शोध घेणे करीता पथकाने आपले गोपनिंय
माहीतगार नेमले होते. त्यातुनच दिनांक 02/02/2024 रोजी रोजी पथकाला गोपनिंय माहीती मिळाली कि, पाहीजे आरोपी
कैलास दिपक गोहाडे वय 28 वर्षे रा. ग्राम किन्ही, ता. जि. यवतमाळ हा बारीपुरा दिग्रस जि. यवतमाळ येथे आला आहे अशा प्राप्त माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील पथकाने माहीती प्रमाणे सदर ठिकाणी रवाना होवुन आरोपी कैलास दिपक गोहाडे वय 28 वर्षे रा. ग्राम किन्ही, ता. जि. यवतमाळ याचा बारीपुरा
दिग्रस परीसरात शोध घेवून शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा मागील 05 वर्षा पासुन अटक टाळण्यासाठी फरार राहत असल्याने पुढील कायदेशीर कारवाईस्तव पो.स्टे. यवतमाळ (ग्रा.) जि. यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही डॉ. पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, चिलुमुला रजनीकांत सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, स.पो.नि. गणेश वनारे, पोलिस
शिपाई बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल बेग, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



