आर्णी पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे,५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन आर्णी हद्दीत घडलेले चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्यकरीता पोलिस अधिक्षक यांनी आवश्यक त्या सुचना व आदेश निर्गमीत केले होते त्या अनुषंगाने खालील नमुद घरफोडीचे गुन्हे दाखल होते.
१) अपराध क ७८७/२०२३ कलम ४५४,३८०, भा द वि. दिनांक १४/११/२०२३ ला दाखल.
२) अपराध क ७८९/२०२३ कलम ४५७,३८० भा. दं.वि दिनांक १५/११/२०२३ ला दाखल.
३) अपराध क ७४६/२०२३ कलम ३८० भा. दं. वि. दिनांक २३/१०/२०२३ ला दाखल
४) अपराध क ७२८/२०२२ कलम ४५७,३८० भादं वि दिनांक २८/०७/२०२२ ला दाखल.
वरील दाखल गुन्हयांमध्ये अज्ञात आरोपींचा कसोशीने शोध घेवून आर्णी पोलिसांनी वरील गून्हयांमध्ये आरोपी –

१) शुभम देवानंद वानखडे वय २२वर्ष रा. जिजाउनगर आर्णी





२) अज्जु उर्फ सोहेल अनिस माकोडे वय २२ वर्ष रा. आमराईपुरा आर्णी



३) पवन अविनाश राठोड वय २२ वर्ष रा. खेड ह.मु. जिजाऊनगर आर्णी



४) किष्णा आनंदा वैद्य वय २४ वर्ष रा. शास्त्रीनगर आर्णी

यांना ताब्यात घेऊन  त्यांना बारकाईने व विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. व तपासदरम्यान त्यांचेकडून खालील नमुद मुददेमाल जप्त करण्यात आला.
१) सोन्याची लगड ५८ ग्रॅम २) सोन्याचे डोरले २नग, टॉप्स ०२नग, लेडीज अंगठी ०२ नग, सोन्याची लहान अंगठी ०२ नग, सोन्याचे फुले ०२ नग, सोन्याची मोठी अंगठी ०१ नग, सर्व दागीन्याचे वजन २३ ग्रॅम ९०० मीली. तसेच चांदीचे शिक्के ०७ नग, चांदीचे ताट ०१ नग वजन ४७ ग्रॅम असा एकुण सोन्याचे दागीने ८१ग्रॅम ९०० मीली. किंमत ४,०१,३८० /- रू. चांदीचे दागीने ४७ ग्रॅम किंमत ३५००/- रू. एक लॅपटॉप किंमत २५०००/- दोन मोबाईल किंमत ९०००/- रू. पांढ-या धातुची तुकडे असलेली समई ३००/- ताब्याचे तार ०५ कीलो जुने वापरते किंमत ३०००/- रू नगदी रोख रक्कम ५५,०००/- रू. व घरफोडी करण्याकरीता वापरण्यात आलेला ०२ लोखंडी रॉड असा एकुण किंमती ४,९७,१८०/- रू चा मुददेमाल
जप्त करण्यात आर्णी पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई ही  पवन बन्सोड , पोलिस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप साहेब, अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभगीय पोलिस अधिकारी दारव्हा यांचे मार्गदर्शनात  केशव ठाकरे पोलिस निरीक्षक आर्णी, पोउपनि गजानन अजमीरे, पोउपनि चंदन वानखडे, स.पो.नी गणेश वनारे स्था.गु.शा.यवतमाळ पोहवा गणेश राठोड,विजय चव्हाण, अरविंद जाधव, पोना मनोज
चव्हाण,  योगेश संकुलवार, पोशि मिथून जाधव, आकाश गावंडे,  अशिफ खल्लीखाउ चालक  सचिन पिसे तसेच स्था.गु.शा.
यवतमाळ पथक यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!