नायब तहसिलदार यांचेवर हल्ला करणारा वाळुतस्तर सुरज्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

 महागाव येथील नायब तहसिलदारावर हल्ला करुन फरार असलेला व  गंभीर गुन्ह्यामधे पाहीजे  असलेला कुख्यात
सुरज्या देशी पिस्तुलासह अटक,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई…..

यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी विशेष मोहिम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे
आदेश दिलेले असून त्याअनुषंगाने मोहिम राबवित असतांना महागाव परिसरातील मोटार सायकल चोरी, चोरी,
रेती, दारु चे गुन्हे असलेला सुरज्या ऊर्फ सुरज नरवाडे हा देशी पिस्तुल जवळ बाळगुन फिरत असल्याची माहिती दिनांक २१/१२/२०२३ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळाल्यावरुन पो.स्टे महागाव परिसरात कलगाव टि पॉईंट येथे जाऊन सुरज्या ऊर्फ सुरज कृष्णराव नरवाडे वय २३ वर्ष रा. संभाजी चौक, महागाव यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून ०१ देशी बनावटीचे पिस्तुल (अग्नीशस्त्र) व पिस्तुलाचे मॅग्जीनमध्ये असलेला ०१ जिवंत काडतुस
असे एकुण ५१,०००/-रु मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीवर यापुर्वी पो.स्टे. महागाव येथे १) अप.क्र. ६०/२०२० कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये चोरीचा गुन्हा २) अप.क्र. ६२६/२०२० ३) अप.क्र. ६५०/२०२० ६५, (ई) म.दा.का अन्वये ४) अप.क्र. १४०/२०२१ कलम १८८,२६९,२७० भादंवि ६५ (ई) म.दा.का अन्वये ०३ अवैध दारुचे गुन्हे ५) अप.क्र. ५००/२०२२ कलम ३२४ भादंवि, अ.जा.ज.अ.प्र.का अन्वये गुन्हा ६) अप.क्र. ५९० / २०२३ कलम ३५३, ३७९ भादंवि अन्वये रेती चोरी करुन शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याबाबतचा गुन्हा ७) अप.क्र. ६१३/२०२३ कलम ४/२५ आर्म अॅक्ट अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा व पो.स्टे. महागाव, उमरखेड येथे मोटार सायकल चोरीचे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. तो मागील काही दिवसांपासून रेती माफीया म्हणून उदयाला आलेला असून त्याचेवर दिनांक २३/१०/२०२३ रोजी पो.स्टे. महागाव येथे रेती चोरी करुन जात असतांना नायब तहसिलदारावर हल्ला केल्याबाबतचा गुन्हा नोंद असून त्या दिवसापासून तो सदर गुन्ह्यात फरार होता.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात
सपोनि संतोष मनवर, पोलिस अंमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, योगेश गटलेवार, योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!