
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती तस्करांवर कार्यवाही…
बुलढाणा – जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेती वाळूची होणारी वाहतूक, साठवणूक आणि रेतीची चोरटी विक्री करणारे ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक. अशोक लांडे स्थानिक गुन्हे.शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या व विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने, दि. 23/09/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन पो.स्टे. नांदूरा हद्दीत अवैध व विनापरवाना गौण खनिज वाहतूक संबंधाने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आरोपी (
1) विठ्ठल मधुकर निंबाळकर रा. नांदूरा हा त्याचे ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या टिप्परमध्ये 2.5 ब्रास रेतीची विनापरवाना व अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना मिळून आला. नमुद आरोपी
याचे कडून 2.5 ब्रास रेतीसह, एक अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर असा 25,15,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमुद आरोपी तसेच टिप्परचा मालक यांचे विरुध्द पो.स्टे. नांदूरा येथे भादंविचे कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. नांदूरा करीत आहेत.
तसेच दि.24/09/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन पो.स्टे. शेगांव (शहर) हद्दीत अवैध व विनापरवाना गौण खनिज वाहतूक संबंधाने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आरोपी


(1) देवानंद विलास पहुरकर रा. शेगांव हा त्याच्या ताब्यातील आयशर 2110 कंपनीच्या टिप्परमध्ये 2 ब्रास रेतीची विनापरवाना व अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना मिळून आला. नमुद आरोपी याचे कडून 2 ब्रास रेतीसह, एक आयशर 2110 कंपनीचा टिप्पर असा 20,20,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर प्रकरणी चालकासह वाहनाचा मालक यांचे विरुध्द पो.स्टे. शेगांव (शहर) येथे भादंविचे कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात असून पुढील तपास पो.स्टे. शेगांव शहर पोलिस करीत आहेत.
वरील प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांचे पथकाने दि. 23.09.2023 आणि दि.24.09.2023 रोजी रेती चोरी संबंधाने 02 वाहनांना पकडून, 04 आरोपी विरुध्द कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 45,35,000/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

सदरची कारवाई सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये ,अपर पोलिस अधिक्षक खामगाव थोरात, बी.बी महामुनी, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे प्रभारी अधिकारी – स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात, सपोनि.स्वप्निल नाईक, निलेश सोळंके, पोहेकॉ. राजेंद्र अंभोरे, अरुण हेलोडे, पंकज मेहेर, पोना. गणेश पाटील, पोकॉ. दिपक वायाळ, जयंत बोचे, विजय सोनोने, विक्रम इंगळे, चापोना. रवि भिसे, चापोकॉ. विलास भोसले सर्व
स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली



