
बनावट मिरची पावडर व मसाले बणवणारे कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
धुळे MIDC निक्रुष्ट दर्जाचे लाल मिरची व पावडर, सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य व हानीकारक मिरची पावडर व मसाले तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन केला उध्वस्त….
धुळे प्रतिनिधी (ॲड.प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(25) सप्टेंबर रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, यांना गोपनिय माहिती मिळाली की, धुळे शहरातील एम.आय.डी.सी. अवधान मधील प्लॉट नं.E-100 येथे इम्रान अहमद अख्तर हुसैन नामक इसमाने निकृष्ट लाल मिरची व पावडर सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य/हानीकारक मिरची मसाले तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला आहे, अशी खात्रीशिर बातमीवरुन पथकासह एम.आय.डी.सी. अवधान मधील प्लॉट नं.E-100 येथे छापा टाकला असता, तेथे (1) इम्रान अहमद अख्तर हुसैन, वय-43 वर्ष, व्यवसाय-मिरची केंद्र, रा.मुस्लिम नगर, हजार खोली, धुळे (2) जैद अहमद जलिल अहमद अन्सारी, वय-34 वर्ष, रा.फातिमा मशिद जवळ, शंभर फुटी रोड, धुळे (3) मसुद अहमद अब्दुल हलीम, वय-44 वर्ष, रा. मौलवी गंज, घडयाळवाली मशिदजवळ, धुळे यांचे कब्जात मिरची दळण्याकरिता व तिची भुकटी तयार करणारे मशिन, केमीकलयुक्त रंग व मिरची पावडर एकत्र करण्यासाठीचे मिक्सर, पॅकींग मशिन, केमीकलयुक्त रंगाचे डबे, निकृष्ट खाद्यतेल, निकृष्ट लाल मिरची, सडका लसुण, भेसळ युक्त तयार केलेल्या मिरची पावडर मसाला गोण्यांमध्ये भरलेला साठा मिळुन आला


वरील छापा कारवाई दरम्यान सदर स्थळी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, यांनी भेट दिली असुन, संपुर्ण बनावट व घातक मिरची पावडर मसाला कारखान्याची पहाणी केली व अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे देखील छापा कारवाई वेळी हजर होते, प्राप्त मुद्देमालाची न्याय वैद्यक प्रयोग शाळेकडुन अभिप्राय मिळणेकरिता सर्व सामग्रीचे नमुने घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.

वरील तिनही इसम हे निकृष्ट लाल मिरची व पावडर, सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य हानीकारक मिरची मसाले तयार करुन विक्री करीत होते. सदर भेसळयुक्त मिरची पावडर शरीरास अपायकारक असुन, त्यामुळे कॅन्सर सारखा दुर्धर आजार होवु शकतो.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, सपोनि श्रीकृष्ण पाटील, पोउनि. प्रकाश पाटील, पोहवा प्रशांत चौधरी,मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संतोष हिरे,पोशि कमलेश सुर्यवंशी,राहुल गिरी,मयुर पाटील,हर्षल चौधरी व मोहाडीनगर पोलिस ठाणेचे पोहेवा संदीप कदम व पोशि जय चौधरी यांनी केलेली आहे.


