गुन्हे शाखेने २१ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…
अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतुक करणार्याच्या अमरावती गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,२१ किलो गांजा केला जप्त…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. (१८) रोजी गुन्हे शाखेचे पथकास पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने पोलिस स्टेशन बडनेरा हद्दीतील यवतमाळ टी पॉईंट या ठिकाणी दुपारी २.२० वाजताचे सुमारास छापा टाकला असता आरोपी नामे समीर शाहा अख्तर शाहा वय
१८ वर्ष रा. सिंधीबन, मोठा ताजबाग, नागपुर व त्याचा फरार साथीदार साकीब भाई वय अं ३० वर्ष रा. अंसारनगर अमरावती हे आपल्या ताब्यातील दोन कॅालेज बॅग आणि एका कापडी पिशवीमध्ये गांजा नावाच्या अंमली पदार्थाचे १० प्लास्टीकचे पॅकेट विक्रीकरीता बाळगून वाहुन नेत असताना मिळून आले.
सदर पॅकेटमधील गांजा मालाचे मोजमाप केले असता त्यांचे ताब्यात एकुण २१.२६५ कि.ग्रॅ. वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ कि. अं. ४,२५,३०० ₹ चा मुद्देमाल मिळून आला. दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन बडनेरा येथे कलम २०,२२,२९
एनडीपीएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी साकीब हा फरार असुन त्याचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गुन्हे मुख्यालय कल्पना बारवकर पोलीस उपायुक्त यांचे आदेशाने सहा.पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल आठवले गुन्हे शाखा युनिट क्र २ यांचे मागर्दशर्नाखाली सपोनि योगेश इंगळे, सपोउपनि अजय गाडेकर, पो. हवा. सुधीर
सोनपरोते, अमर बघेल, सैयद इमरान अली, विजय पेठे, अजय मिश्रा, संदीप खंडारे व सुधीर गुडधे यांनी केली.