राजापेठ पोलिसांनी उघड केले ३ लक्ष रुपयाचे मोबाईल चोरीचे गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राजापेठ(अमरावती शहर) ः सदर प्रकरणाची हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद घटना ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांनी दिनांक ०९.०९.२०२३ रोजी पो स्टे ला येवुन तकार दिली की, त्यांचा एक samsang galaxy f 14 मोबाईल ज्याचा imei no.
350145990370370 & 350145990370372 असा असलेला दिनांक ०९.०९.२३ मे ०७.४५ वा ते ०८.००वा दरम्याण फिर्यादीच्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अश्या फिर्यादीच्या तक्रारीवरुन  अपराध क्रमांक ८३० / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये सायबर सेल पोलिस स्टेशन अमरावती शहर यांच्या कडुन प्राप्त माहीती वरून इसम मयुर राठोड याचेकडे सदर गुन्हयातील मोबाईल मिळाल्याने त्यास विचारपुस केली असता त्याने सदर मोबाईल  शॉप वरून घेतल्याचे सांगीतल्याने मोबाईल शॉपच्या मालकास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, वैभव हाळोडे व अक्षय अंभोरे नावाच्या व्यक्तींनी श्रध्दा मोबाईल, अकोला या नावे खोटे बिल देवून विक्री केल्याचे सांगीतले. वरून मोबाईल शॉप धारकां कडुन आरोपी वैभव हाळोडे व अक्षय अंभोरे या दोघांनी खोटे बिल बनवुन खालील प्रमाणे मोबाईल विकल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने खालील प्रमाणे मोबाईल जप्त करण्यात आले.सदर कार्यवाही दरम्याण एकुण २,३३,००० /- रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर कार्यवाहीमुळे पो स्टे
अभीलेखावरील व इतर ठिकाणावरील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच

सदरची कारवाई नविनचंद्र रेडडी पोलिस आयुक्त अमरावती शहर, विक्रम साळी पोलिस उपायुक्त परि- २ अमरावती शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त, राजापेठ विभाग, अमरावती, यांचे मार्गदर्शना खाली सिमा दाताळकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पुनीत कुलट काईम पोलिस निरीक्षकं, पो.स्टे. राजापेठ अमरावती, पोउनी गजानन काठेवाडे, पोहेका मनीश करपे, नापोका रवी लीखीतकर, पंकज खटे,  गनराज राउत, विजय राउत व पोका सागर भजगवरे यांनी केली. सदर कार्यवाही करीता सायबर पो स्टे चे पोनी तांमटे, सपोनी कासार, नापोकों सचीन भोयर यांचे तात्रीक मार्गदर्शन लाभले.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!