
सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…
सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई….


तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना
मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती अवैध हातभट्टी मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त प्रमाणात वाढले होते. दारूच्या सेवनामुळे तरूण मुले व ग्रामीण भागातील लोंक आहारी जावुन त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम होत असुन वेगवेगळया आजाराला बळी पडत आहेत. त्यामुळे महिला, तरूण मुले यांचे जिवन उद्वस्त होत आहेत.अशा तक्रारी प्राप्त होत होत्या

त्याअनुषंगाने अशा अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिसांचे काम सुरूच आहेत. त्याच दृष्टीने सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर रश्मिता राव एन. (भा.पो.से.) यांनी त्यांचे कार्यालयीन पथकासह पाथरी परीसरात अवैध दारुअड्यावर दिनांक २३/०४/२०२४ रोजी पाथरी येथील शेतशिवारात प्रमोद अशोक बरीये वय ३३ वर्ष रा. पाथरी याचे दारू काढण्याचे भट्टीवर रेड केली असता त्या ठिकाणी दारू काढण्याचे
साहीत्य, हातभट्दाटीची दारू, मोहाफुल सडवा (रसायन) असा एकुण २,३५,००० /- रू. चा मुद्देमाल नाश करण्यात आला

तसेच दिनांक २५/०४/२०२४ रोजी मनोज शेंडे रा. पाथरी याचे बावनथडी नदी पात्रावरील (किनाऱ्यावर) दारू काढण्याचे अड्यावर धाड घातली असता त्या ठिकाणी दारू काढण्याचे साहीत्य, हातभट्टी मोहा .दारू, मोहाफुल सडवापास (रसायन) असा एकुण २,१८,०००/-रू.चा मुद्देमाल मिळुन आला असुन या दोन्ही कार्यवाही मधे पो.स्टे. गोबरवाही येथे कलम ६५(फ) ई. मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक लोहीत मतानी,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकोडे,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी तुमसर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय तुमसर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली
सदरची मोहीम ही ग्राम पाथरी येथे पुर्णपणे दारूबंदी करण्याचे उद्देशाने करण्यात आली असुन ग्राम पाथरी येथे जेव्हा-जेव्हा अवैध मोहाफुलाची हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याचे माहीती मिळेल त्या त्या वेळेस छापा टाकला जाईल. तसेच ग्राम पाथरी येथील अवैध मोहाफुलाची दारू विक्रेता यांना सर्तक राहावे असे रश्मिता राव एन. (भा.पो.से.) उपविभागीय पोलिस अधिकारी तुमसर यांनी अशी चेतावणी दिली आहे.


