
चंदनाचे लाकडाची वाहतुक करणारे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अवैधरित्या चंदनाचे लाकडाची ची वाहतुक करणारे,हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद
06 किलो चंदनाचे लाकुड ( गाभा ) किं. 30 हजार रू. व मोटार सायकल असा 1 लाख 10 हजार रू. चा मुददेमाल जप्त 02 आरोपीस केली अटक….


हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- ११/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड करने व अवैध धंदे विरोधात कार्यवाही कामी
पेट्टोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, कुरूंदा येथील राहणारे ०२ इसम
त्यांचेकडील मोटार सायकलवर अवैधरित्या व विनापरवाना चंदनाचे गाभा असलेले लाकुड विक्री करीता वाहतुक करून घेवुन जात आहेत अशी माहीती मिळाले वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहीतीच्या आधारे पेट्टोंलींग करत पोलिस स्टेशन. नरसी नामदेव हददीतील केसापुर फाटा येथील रोडवर सापळा लावुन हिंगोलीकडुन सेनगावकडे जाणारे रोडवर संशयीत मोटार सायकल पकडुन तपासणी केली असता सदर मोटार सायकलवर ०२ इसम १) शेख अली शेख अहमद वय ३० वर्ष २) शेख अनवर शेख जानी वय ३५ वर्ष दोन्ही रा. नई आबादी मोहल्ला कुरूंदा मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्याचे तपासणी केली असता त्यांचे जवळ एका पिशवीत अंदाजे ०६ किलो चंदनाचा गाभा
लाकुड मिळुन आला. पोलिसांनी नमुदचे चंदनाचे गाभा लाकुड ०६ किलो किं. ३०,००० रू. व हिरोहोंडा सिबीझेड मोटारसायकल किं. ८०,००० रू. असा एकुण १,१०,००० रू. चा मुददेमाल जप्त करून नमुद दोन्ही इसमां विरोधात पोलिस स्टेशन नर्सी नामदेव येथे गुरनं. ०२/२०२४ कलम ३७९,३४ भा.द.वी. सह कलम ४१, ४२ भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठठल काळे, गणेश लेकुळे, विठठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, अजित सोर, तुषार ठाकरे यांनी केली



