
गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नीशस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढुन अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशीत केले होते


त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या त्याअनुषंगाने स्थागुशाचे पथक वरणगाव परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील नापोशि श्रीकृष्ण देशमुख यांना गोपनिय माहीती मिळाली की वरणगांव शहरातील वरणगांव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकाना जवळ एक ईसम गावठी कट्टा बाळगुन आहे अशा गोपनीय बातमीवरुन सदर ठिकाणी जाऊन ईसमास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय ३९, रा. रामपेठ वरणगांव ह.मु. शिवराय चौक फुलगांव वरणगांव ता. भुसावळ असे सांगितले

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५,०००/- रु. किं. चे १ गावठी बनावटीची पिस्टल व ८,०००/- रु. किं. चे ८ जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वरणगांव पोस्टे CCTNS No.. १६५/२०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी वरणगांव पोस्टेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, जळगांव अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी,मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे सुचनेनुसार पोहवा प्रितम पाटील, नापोशि श्रीकृष्ण देशमुख यांनी केली


