देवरी येथे दरोडा घालणाऱ्यास गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

देवरी(गोंदिया)- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार -फिरोज खान गुलाम हुसेन खान राहणार खोलापूर तालुका- भातकुली, जिल्हा अमरावती हे त्यांची ताब्यातील ट्रकने कृषी उद्योग कंपनी मधून खताची थैल्या ट्रकमध्ये भरून अमरावती वरून नागपूर- रायपूर- हायवे नी देवरी ला येऊन थांबले व ट्रकचे केबिनमध्ये जेवण करीत असताना घटना तारीख- 23/08/ 23 रोजीचे रात्री 22.00 वा ते 22.30 वा दरम्यान चार अनोळखी इसमानी तोंडाला काळी रुमाल बांधून गाडीचे केबिनमध्ये चढून फिर्यादी कडील ट्रकची जबरीने चावी घेऊन ट्रक रायपूरचे दिशेने फिर्यादीसह घेवून गेले. भरेगाव जवळील हायवे रोडवर ट्रक थांबवून चाकूचा धाक दाखवून चाकू डाव्या पायाचं मांडीवर मारून दुखापत केली. तसेच फिर्यादी कडील 2800/- रू. व ट्रक ची चाबी, जबरीने हिसकावून घेतले. तसेच देवरी येथे थांबलेल्या फिर्यादीचे भावाकडून ईतर चार अनोळखी ईसंमांनी नगदी 5500/- जबरीने हिस्कावले अश्याप्रकारे 8 अनोळखी आरोपीतांनी 8300/- रु. नगदी जबरीने हिसकावुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे देवरी येथे अपराध क्रमांक 289/ 2023 कलम 395, 397, 365 भादवि अन्वये दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांनी सदर गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्यातील दरोडा घालणाऱ्या गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत ठाणेदार पोलीस ठाणे देवरी, तसेच पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांना निर्देशीत केले होते. या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश, आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश लबडे, पो. नि. प्रवीण डांगे, यांचे मार्गदर्शनात दरोडा घालणाऱ्या गुन्हेगारांच्या शोधाकरीता पो. ठाणे देवरी, तसेच स्था. गु. शा. ची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हेगारांच्या शोधा करीता रवाना करण्यात आली.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळाचे भौतिक पुरावे, प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता, सदरचा गुन्हा फिर्यादीच्या जागी यापुर्वी नोकरी करत असलेला इसम नामे युसुफ खान रा. अमरावती याने करवला असल्याची शंका आली. त्यानुसार तपास केला असता,सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे-
*दरोडा घालणारे आरोपी नामे* —
1) सलमान नियामत खान वय 20 वर्षे, पत्ता- हनुमान नगर हैदरपुरा, शकील किराणा दुकान जवळ, अमरावती

2) मोहम्मद खान समीउल्ला खान वय 28 वर्षे, पत्ता- लालखडी, रींग रोड, नवसारी अमरावती





3) मोहम्मद शोहेब मोहम्मद शब्बीर वय 27 वर्ष, पत्ता नालसाहेबपुरा, अमरावती



4) शेख तौफीक शेख मुस्ताक वय 24 वर्षे पत्ता लालखडी चौक बिस्मील्ला नगर, जि. अमरावती



5) शेख नदीम शेख नबी पत्ता-सावंगी, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती

6) शेख युसुफ शेख अन्नु पत्ता- आलीमनगर अमरावती यांचा दरोडयात सहभाग असल्याची खात्री झाली.

त्यानुसार दिनांक 28/08/2023 रोजी यातील *आरोपी नामे -*
*1) साहील खान उर्फ शेख तोसीफ शेख मुस्ताक वय 24 रा. लाल खडी चौक बिस्मिल्ला नगर जिल्हा अमरावती* यास पोउपनी विघ्ने यांचे पथकाने तुमसर भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच सपोनि विजय शिंदे, यांचे पथकाने आमरावती येथे रवाना होवून *आरोपी नामे* –
*2) सलमान नियामत 20 वर्ष, पत्ता- हनुमान नगर हैदरपुरा, शकील किराणा दुकान जवळ, अमरावती*

*3) मेहबुब खान खान वय 28 वर्ष, पत्ता- लालखडी, रंग रोड, नवसारी अमरावती*

*4) मोहम्मद शाहेब मोहम्मद शब् 27 वर्ष, पत्ता- नालसाहेबपुरा, अमरावती* यांना अमरावती येथून शोध घेवुन वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आल्याने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा शेख युसुफ शेख अन्नू याचे सांगण्यानुसार केला असल्याची कबुली दिली. युसुफ खान हा मालक नामे मुजीब रहमान यांचे ट्रकवर सदर गुन्हयातील फिर्यादी फिरोज गुलाम हुसेनखा वय 38 वर्षे यांचे जागेवर पुर्वी चालक म्हणुन नोकरी करत होता. फिर्यादी फिरोजखा यास त्याचे विरूद्ध मालकाचे कान भरल्याने नोकरीवरून काढले होते याचा राग त्याचे मनात होता. यासाठी कट करून सदरचा गुन्हा शेख युसुफ शेख अन्नू याने त्यांना करायला सांगीतला असे त्यांनी सांगीतले. आरोपी यांचे ताब्यातून 1200 रूपये रोख मिळून आले सदर पैसे फिर्यादी कडून जबरदस्तीने घेतल्याचे त्याने सांगीतले. तसेच त्याचे ताब्यातील टाटा इंडीगो वाहन क्र एम एच 27 ए सी 6262 हस्तगत करण्यात आले. सदर वाहन त्याने गुन्हयात वापरले असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींच्या नातवाईकांना माहीती देवून त्यांना पुढील कारवाईकामी वैद्यकीय तपासणी करून देवरी पोलीस ठाणे पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण डांगे, ठाणेदार देवरी पुढील तपास व कायदेशिर कारवाई करीत आहेत

*उर्वरीत फरार आरोपी १* ) शेख नदीम शेख नबी पत्ता-सावंगी, ता. चांदुर रेल्वे, जि.अमरावती

२) शेख शेख अनु पत्ता- आलीमनगर अमरावती यांचा शोध घेण्यात येत आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई मा.वरिष्ठांचे निर्देश, आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे श्री.दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात सपोनी विजय शिंदे, महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बिसेन, हंसराज भांडारकर, संतोष केदार, चापोशि कुंभलवार, चापोहवा बंजार, स.फौ. कृपाण, पो.हवा. देशमुख, हलमारे, सायबर सेलचे पोहवा. दीक्षित दमाहे, प्रभाकर पालांदुरकर, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, तसेच ठाणेदार देवरी श्री. प्रवीण डांगे, यांचे मार्गदर्शनात पो.हवा. करंजेकर, डोहळे, पो. शि. चव्हाण, जाधव, कांदे यांनी केलेली आहे. मा. वरिष्ठांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!