
पुर्व वैमनस्यातुन दुचाकींची जाळपोळ करणारा सिताबर्डी पोलिसांचे ताब्यात…
पुर्व वैमनस्यातुन दुचाकी जाळुन नुकसान करणाऱ्यास सिताबर्डी, पोलीसांनी केले जेरबंद…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर शहरात हल्ली काही समाजकंटक लोकांकडून दुचाकी जाळपोळीच्या घटना उघडकिस येतांना दिसताय यावर उपाय म्हनुन वरीष्ठांचे आदेशाने अशा समाजकंटक लोकांना शोधुन त्यांचेवर कठोर कार्यवाहीचे सत्र सुरु आहेच तरीसुध्दा याला चाप बसविण्यासाठी नागपुर शहर पोलिस सदैव तत्पर आहेच


त्यातच दि(२८) ॲागस्ट २०२४ चे रात्री ते २९ चे सकाळी ८.१५ वा चे दरम्यान पोलिस ठाणे सिताबर्डी हद्दीत हाऊस नं. ६९, आंबेडकर नगर, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी निलेश मदनलाल हिरनवार वय ४३ वर्ष यांनी तक्रार दिली की यांनी त्यांचे घरासमोर, रोडवर त्यांची स्कुटी पेप क. एम.एच ३१ ई.जे ६९२३ पार्क करून ठेवली असता अज्ञात आरोपीने त्यांची गाडी जाळुन अंदाजे ७,०००/- रू चे नुकसान केले.

अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द पोलिस ठाणे सिताबर्डी येथे कलम ३२६ (एफ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सिताबर्डी पोलीसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी मयुर श्याम हिरनवार वय ३८ वर्ष रा. गवळीपूरा, शितला माता मंदीर जवळ, धरमपेठ, नागपूर यास निष्पन्न करुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने जुन्या वादाचे कारणावरून वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परि. क. २)राहुल मदने, सहा. पोलिस आयुक्त (सिताबर्डी विभाग)सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि. चकाटे, पोनि. मिर्जापूरे, पोउपनि. तिवारी, शिंदे, पोहवा. त्रिपाठी, पो.अं. रंभापूरे, मांडवकर व रमन खैरे यांनी केली.


