देशी माऊजर व जिवंत काडतुसह एकास खापरखेडा पोलिसांनी घेतले ताब्यात…
अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यास खापरखेडा पोलिसांनी केले जेरबंद..
खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी.बी पथक दिनांक ०७/०९/२०२४ रोजी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय गुप्त सुत्राव्दारे माहीती मिळाली की आशिष विजय शास्त्री वय २३ वर्ष रा. दहेगाव रंगारी यांचेकडे देशी माउझर आहे अश्या माहीतीवरून पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन आशिष शास्त्री यास ताब्यात घेतले
त्यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने कबुल केले की माझाकडे एक देशी लोखंडी माउझर आहे व ती मी माझा घरी लपवुन ठेवलेली आहे अशी कबुली दिल्याने पो. स्टे खापरखेड्याचे अधिकारी व डी बी पथक हे दहेगाव रंगारी वार्ड क ४ येथे आरोपी आशिष शास्त्री यांचे सोबत त्याने सांगितल्याप्रमाणे पंचासह आरोपीच्या घरी गेलो असता आशिष शास्त्री याने त्याचे घरा बाजुला असलेल्या गोठ्यातुन टिनेच्या खाली गाडुन ठेवलेली एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर काढुन दिली
दर माउझर चे मॅग्झीगमध्ये ४ जिवंत काडतुस मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर कि. ५०,०००/- चा व ४ जिवंत काडतुस किमंत ४०००/- रू चा असा एकुण ५४०००/- रू. माल जप्त करून आरोपीविरूध्द कलम ३/२५ भाहका सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलिस अधिकारी,कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरविंदकुमार कातलाम , सपोनि अमरदिप खाडे, सपोनि स्वाती यावले, पोउपनि आरती नरोटे, डी.बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने राजु भोयर, राजकुमार सातुर, आनंद देवकते, अमोल लोहकरे यांचे पथकाने पार पाडली आहे.