तलवार,खंजीर सारखे घातक शस्त्र विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
नांदेड(प्रतिनिधी) – जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार
दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सतर्कता जनरल स्टोअर्स नगीनाघाट नांदेड येथे एक इसमस अवैध्य रित्या तलवारी व खंजर विक्रीसाठी बाळगुन आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन या दुकानाचा विक्रेता
परमजितसिंघ महेंद्रसिंघ रामगडीया वय 40 वर्ष रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड
यास ताब्यात घेवुन त्याचे सतर्कता जनरल स्टोअर्स मध्ये अवैधरित्या 12 तलवारी व 11 खंजर किंमती 35500 /- रुपयाचे विनापरवानगी बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोलिस ठाणे वजीराबाद गुरनं. 536/2023 कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पोलिस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, डॅा खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण, पोहवा शंकर म्हैसनवाड, संभाजी मुंडे, ज्वालासिंघ बावरी, चालक कलीम शेख स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.