
घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार करुन ते धोकादायक पध्दतीने रिफिलींग करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…
पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांचा बेकायदा व्यापार करणा-या संशयित इसमांची माहीती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक २९/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे पथक युनिट हद्दीत पेट्रोलिंग करुन माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, ओटास्किम निगडी व दत्तवाडी आकुर्डी भागामध्ये काही दुकानदार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार करुन मानवीवस्तीमध्ये मोठ्या गॅस टाकीतील गॅस फिलर पीनचे सहाय्याने लहान टाकीमध्ये अवैधरित्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने भरुन विक्री करीत आहेत
अशी माहीती गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला म मिळाली.
मानवी जिवीतास धोका होण्याची संभावना असतांना कोणत्याही प्रकारची सुरक्षीततेची काळजी न घेता ज्वालाग्राही पदार्थाबाबत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करुन घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधुन दुस-या टाकीमध्ये गॅस भरणे अशा कृत्यामुळे एखादा मोठा स्फोट होवून जिवीत हानी होवू शकते याचे गांभीय ओळखुन लागलीच गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी त्यांचे पथकांना सुचना देवून बातमीचे ठिकाणी रवाना केले. मिळालेल्या बातमीप्रमाणे सुर्या गॅस सर्व्हिस गणेश कामगार नगर, दत्तवाडी, आकुर्डी व क्रिष्णा गॅस सव्र्हींस आझाद चौक, ओटास्किम, निगडी या ठिकाणी सापळा लावुन गॅस रिफलिंग करणारे इसम


१) काशिनाथ पाटिल वय २४ वर्षे धंदा व्यवसाय रा. घर नंबर ०२, ज्ञानदिप सोसायटी, रुपीनगर, तळवडे, पुणे.

२) सुशांत तानाजी घाडगे वय ४३ वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. घर नं. ए/१७ पांडवनगर, कॉलनी नं. ०२ चक्रपाणी वसाहत भोसरी, पुणे

३) अर्जुन रामचंद्र नरळे वय ४० वर्षे, धंदा- गॅस रिफलिंगव रिपेरींग रा. पंचगंगा हौसिंग सोसायटी, संजु दोडमिशे यांची रुम, पोस्ट ऑफीस शेजारी, रुपीनगर, तळवडे, पुणे. मुळपत्ता- मु.पो. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापुर
यांचेवर छापा कारवाई करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. तपासामध्ये असे निदर्शनास आले कि, सरस्वती गॅस एजन्सी संभाजीनगर मधील इसम
सुशांत तानाजी घाडगे हा ज्या ग्राहकांनी गॅस बुकींग केले आहे त्यांना देण्यासाठी आणलेल्या गॅस टाक्या ग्राहकांना न देता सुर्या गॅस सर्व्हिस दत्तवाडी, आकुर्डी येथील शरद काशिनाथ पाटील या दुकानदारास जादा दराने विक्री करुन तो लहान टाक्यांमध्ये
गॅस रिफलिंग करुन विक्री करीत होता. तसेच क्रिष्णा गॅस सर्व्हिस, आझाद चौक, ओटास्किम, निगडी, येथे येथे
अर्जुन रामचंद्र नरळे हा लहान टाक्यांमध्ये गॅस रिफलिंग करुन विक्री करीत असतांना मिळुन आला आहे. सदर दुकानदारांकडून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, लहान सिलेंडर, रिफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी यांचेविरुध्द भारतीय दंडविधान संहीता कलम २८५, २८६, ३४ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. निगडी पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार दिपक खरात, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, संदेश देशमुख, उध्दव खेडकर आतिष कुडके, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली आहे.


