व्यावसाईकांना गंडा घालणाऱ्या बंटी व बबलीस पिंपरी-चिंचवड युनिट ४ ने केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाकड(पिंपरी-चिंचवड)-(महेश बुलाख)  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक – ०८/०९/२०२३ रोजी वाकड पोलिस ठाणे येथे दिलीपकुमार माली, रा-रहाटणी, पुणे यांनी तक्रार दिली होती की, एक महिला व पुरुष हे त्यांचे कपडयाचे दुकानात येवुन कपडयांची खरेदीकरुन ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगुन ऑनलाईन पेमेंटचा ट्रान्झेशन सक्सेस फुल असा खोटा स्क्रिन शॉट दाखवुन त्यांची फसवणुक केल्याने वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर – ८९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ आय.टी.अॅक्ट६६(ड) प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने व असे प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी सर्व गुन्हे करणाऱ्या आरोपीस  अटक करुन गुन्हा उघडकीस आणने  बाबत आदेशित केले होते.

त्याअनुंषंगाने  गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलिस  निरीक्षक शंकर आवताडे तसेच सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार हे दाखल गुन्हयाचा तपास करत असताना घडलेल्या गुन्हयाचे पोशि  प्रशांत सैद यांनी सखोल तांत्रिक विश्लेषणकरुन आरोपी निष्पन्न केला. परंतु आरोपी हा खुप चालाक होता तो व्यवसायिकांना फसवल्यानंतर फसवणुक करणारामोबाईल नंबर हा जागेवरच स्विच ऑफ करत असे तसेच तो वेळोवेळी नविन मोबाईल नंबरचा वापर करत होता तसेच
त्याचे राहण्याचे ठिकाण देखिल तो बदल होता. परंतु केलेल्या तांत्रिक विश्लेषणा वरुन सदर आरोपी हा रहाटणी वाकडपरिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा. पो. उप.नि. नारायण जाधव,संजय गवारे, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, पोशि प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांनी आरोपी नामेगणेश शंकर बोरसे, वय-३४ वर्षे, रा-काकडे यांची रुम, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले.सदर आरोपीस ताब्यात घेतल्या नंतर त्याचे कडे कौशल्यपुर्ण तपास केला असता सदर आरोपी व त्याची पत्नी प्रिया गणेश बोरसे, वय – २८ वर्षे, रा-सदर हे दोघे तसेच काही ठिकाणी त्यांच्या दोन लहान मुलांसह जावुन मागीलदोन-तीन वर्षा पासुन सर्व जिवनावश्यक वस्तु तसेच मौजमजेच्या वस्तु हे दोघे दुकानात जावुन दुकानदाराशी गोड बोलुनविश्वास संपादन करुन वस्तु खरेदी करत असे तसेच काही व्यवसायिकांकडुन खर्चासाठी रोख रक्कम नाही असे सांगुन रोख रक्कम देखिल घेत. तसेच खरेदी केलेल्या वस्तुंचे बिल व रोख रक्कम असे मिळुन ऑनलाईन पेमेंट आहे का असे
विचारुन एन.ई.एफ. टी व्दारे आय. सी. आय. सी. आय बॅकेच्या बॅकिंग अॅप व्दारे खोटे सक्सेस पेमेंट झाल्याचा स्क्रिनशॉट व्यवसायिकांना दाखवत होता. तसेच तो व्यवसायिकांना सांगत असे की एन. ई. एफ. टी व्दारे केलेले पेमेंट हे २४ तासाच्याआत येते जर पेमेंट आले नाही तर तो त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर देत असे व दुकानदारांना विश्वास बसण्यासाठी त्याचे नंबरवर मिस कॉल मारण्यास सांगत होता. त्यानंतर दुकानदारांचा विश्वास बसल्यावर तो सामान घेवुन जात व बाहेर गेल्यावर लगेचच सदर दुकानदाराची मोबाईल नंबर ब्लॉक लिस्टला टाकत होता. त्यांनतर लागलीच मोबईल मधुन त्याचे नंबरचे सिमकार्ड काढुन ठेवत असे.
त्यानंतर पुन्हा ज्यावेळी तो अशी खरेदी करण्यास जात असे त्यावेळी ते सिमकार्ड पुन्हा टाकत असे. तो जो मोबाईलनंबर दुकानदारांना देत होता तो इतर व्यक्तीच्या नावावर होता तसेच त्याने त्यानंबर वरुन दोन वर्षा मध्ये एकाही व्यक्तीला आऊटगोविंग कॉल केला नाही. तसेच तो वेळोवेळी नवनविन सिमकार्डचा वापर करत असे तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण देखिल एक नव्हते. तसेच आपण पकडले जावु नये म्हणुन तो पुरेपुर काळजी घेत होता पकडले जावुनये म्हणुन त्याने बायकोला मोबाईल फोन वापरुन दिला नाही. सदर आरोपीचे एफ.वाय.बी.एस.सी पर्यतचे शिक्षण झाले
असुन त्याने आता पर्यत पेरु, आंबे, पानीपुरी, किराणा, मेडीकल, केक, मसाले, हार, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रीकवस्तु, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, नर्सरी अशा ३०० ते ४०० व्यवसायिकांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत. तसेच त्याची पत्नी नामे प्रिया गणेश बोरसे, वय – २८ वर्षे, रा- सदरहिला देखिल अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड हे करत
आहेत.
१) वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर-८९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४
२) वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर ८९९/२०२३ भा.दं. वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४
३) सांगवी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-४८७/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४
४) भोसरी पोलीस ठाणे, गु.र. नंबर- ७३५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४
५) रावेत पोलीस ठाणे, गु.र. नंबर- ३३३ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
६) भोसरी एम.आय.डी.सी पो ठाणे, गु.र. नंबर- ३९६ / २०२३ भा.दं.वि. कलम-४२०, ४६८, ४७१, ३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
आय. टी. ॲक्ट ६६ (ड)
आय. टी. ॲक्ट ६६ (ड)
आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे ,सह पोलिस आयुक्त,डॅा.संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे , सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे सतिष माने सो, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा. पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरनाळे, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावंडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा / नागेश माळी, पोशि/ नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!