
शासकिय जागेतून अवैधरित्या गौखनिजाची चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात,७२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
MIDC च्या जागेतून अवैधरित्या गौखनिजाची उत्खनन करुन चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात
सेवाग्राम(वर्धा)(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २८ रोजी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने परीसरात अवैध धंदे कार्यवाही संबधाने सरकारी वाहनाने पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत गस्त करीत असतांना रात्री १२.१० वा चे दरम्यान उप अभियंता एमआयडीसी वर्धा संजय सोमेश्वरराव लोटावार वय 55 वर्षे यांनी माहीती दिली एमआयडीसी चे मालकीच्या रिकाम्या जागेतून मुरुमाचे अवैद्यरित्या पोकलँड द्वारे उत्खनन करून मुरूम टिप्पर मध्ये भरून मुरुमाची चोरी केली जात आहे.अशा माहिती वरून फिर्यादी यांनी डायल ११२ ला कॉल करून तसेच आपले कार्यालयातील कर्मचारी यांना पोलिस स्टेशन ला पाठवून सदर कर्मचारी व पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी तिनं ईसम संगणमताने मुरूम चोरी करतांना मिळून आले.त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव


१) अक्षय दिनेश बुरांडे रा.धानोरा
२) आकाश अरविंदराव फुलझले रा. येळाकेळी
3) रितिक शालिकराव गवई रा. येळाकेळी
४) सुखाराम भोग सिंग उईके रा. लखनाडु ता. शिवानी जिल्हा बालाघाट,असे सांगितले

तेव्हा अधीक पाहणी केली असता एका टिप्पर मध्ये चार ब्रास मुरूम व दुसऱ्या टिप्पर मध्ये सहा ब्रास मुरूम असा एकूण दहा ब्रास मुरूम किंमत 20000/-₹ चा माल चोरून नेत असताना मिळून आला. घटनास्थळावरून दोन टिप्पर मुरूम सह व एक पोकल्यांड मशीन असा एकूण ७२.२०,०००/-₹ .चा माल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी तक्रारीवरुन वरून आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन,सेवाग्राम येथे अप. क्रमांक. 48/2024 कलम 379,34 भा द वी. सहकलम 48(7)(8) म. ज.म. अधीनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन

१)टिप्पर क्रमांक. MH-30 ये.बी.0713 सहाचाकी त्यामध्ये अंदाजे चार ब्रास मुरूम किंमत 8000/रू टिप्पर किं.अंदाजे 120000 रू 2) टिप्पर क्रमांक एम एच 32 एजे 9977 दहाचाकी यामध्ये अंदाजे सहा ब्रास मुरूम किंमत 12000/रू. टिप्पर किंमत 20,0000/रू. 3) कुमास्तू कंपनीचे पोकलँड मशीन कि अंदाजे 40,00000/रू. असा एकूण जू.की. 72,20000/रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सेवाग्राम पोलिस करीत आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रत्न कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर,यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक चॅद्रशेखर चकाटे,पोउपनि चाफेकर,पोहवा सचिन सोनटक्के,राजु शंभरकर,जितु डांगे,मंगेश धामरे,विलास लोहकरे


