
अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे
सराईत दुचाकी चोरट्यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन १८००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
वर्धा( प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२७) जुलै रोजी चे रात्री चे दरम्यान,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पोद्दार बगीचा रामनगर वर्धा येथे राहणारे शंकर किसनचंद धामेच्या वय 40 वर्ष यांनी आपली दुचाकी MH-32AW6071 Hero Honda Passion Pro ही लॅाक करुन आपले घरासमोर लावली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेली त्यावरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे अप क्र ६७२/२०२४ भान्यासं ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा तपास सुरु होता


सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान रामनगर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की सदरची दुचाकी चोरी ही संशईत आरोपी अथर्व प्रमोद सबनीस वय 21 वर्ष रा. गजानन सायकल स्टोअर गर्जना चौक वर्धा यास निष्पन्न करुन त्यास दुचाकी क्र MH-32AW5071 सह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची दुचाकी ही पोद्दार बगीचा येथुन चोरलेली असुन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी दुचाकी चोरल्याचे कबुल केले

यावरुन त्याचे ताब्यातुन 1) पोस्टे रामनगर अपराध क्रमांक 673 /2024 कलम 303(2) BNS {होंडा एक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए यु 13 34 2) पोस्टे रामनगर अपराध क्रमांक 676 /24 कलम 303(2) BNS( हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच 32 एल 9161) 3) पो स्टे वर्धा रेल्वे अपराध क्रमांक 306/2024 कलम 303(2) BNS ( पांढऱ्या रंगाची एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 32 ए डी 5313) 4) TVS Sport मोटरसायकल गाडी क्रमांक म एम एच 32 ए एम 5030 ही कोठुन चोरली याचा तपास सुरु आहे सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली आहे

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक नूरल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी ठाणेदार पोस्टे रामनगर यांचे निर्देशनात पो उप नि गोपाल शिंदे, व गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिस अंमलदर, पोहवा गिरीश चंदनखेडे, नापोशि ऋषिकेश घंगारे, पोशि अमोल गीते, चेतन पापळे, गजनांन मस्के पोहवा जनार्दन सहारे, चावके आदींनी केली.


