सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ६ चोरीचे गुन्हे…
मोटर सायकल चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक,एकुण ६ मोटर सायकल किं २०००००/- रू च्या केल्या जप्त…
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. १५५/२०२३ कलम ३७९ भादंवि चे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की सदर गुन्हयात चोरी गेलेले वाहन हे आरोपी नामे मयुर नवले रा. रिसोड याने चोरी केल्याबाबत खात्रीलायक माहीती प्राप्त झाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिसोड हददीतुन वर नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्या कडुन २ लाख रूपये रकमेच्या वेगवेगळया कंपनीच्या चोरीच्या
मोटर सायकल ताब्यात घेतल्या त्यावरून पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील एक गुन्हा, पोलिस स्टेशन रिसोड येथील एक गुन्हा तसेच पोलिस स्टेशन माहळुनगे एमआयडीसी जिल्हा पिंपरीचिंचवड येथील एक गुन्हा उघड झाला असुन इतर ३ मोटर सायकल जप्त आहेत.
सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलिस स्टेशन वाशिम शहर यांचे ताब्यात दिले आहे. नागरीकांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहीती तात्काळ
पोलीस प्रशासनास दयावी असे आवाहान वाशिम जिल्हा पोलिस दला तर्फे करण्यात येत आहे.
सदरची कारवाई. पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. रामकृष्ण महल्ले, सपोनि योगेश धोत्रे पोहवा गजानन
अवगळे पोहवा गजानन झगरे,पोहवा प्रविण शिरसाट, पोना गजानन गोटे, महिला नापोकॉ संगिता शिंदे व चालक गजानन जाधव यांचे पथकाने केली आहे.