
सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशाने नेर पोलीसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…
नेर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 28/10/2023 रोजीचे रात्री दरम्यान आदित्य मिरखेलकर सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय
पोलिस अधिकारी दारव्हा जि यवतमाळ यांना गोपनिय माहीती मिळाली की, एक बोलेरो पिक अप मालवाहू वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य्यात प्रतिबंधित केलेल्या सुंगधित पान मसाला व गुटखा, तंबाखुची अवैधरित्या वाहतुक होत असुन सदरचे वाहन अमरावती येथुन नेर शहरामध्ये येत आहे अशा गोपनिय माहितीवरुन, उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा यांनी केलेल्या आदेशावरुन पो स्टे नेर येथील सपोनी बाळासाहेब नाईक, पोउपनि किशोर खंडार, दिपक बदरके, सफौ नरेंद्र लावरे, अनिस सय्यद, पोकॉ योगेश शेळके, दोन पंच असे नेर बायपास येथे जावुन तेथे सदर वाहनावर कारवाई करण्यासाठी सापळा रचला असता अमरावती कडुन नेर शहराकडे एक वाहन ज्याचा क्रमांक एम एच 29 टी 6279 येताना दिसले. सदर वाहन चालकास थांबण्याचा ईशारा करुन वाहन चालकाने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला लावले. त्यास वाहन झडती बाबत माहिती देवुन दोन पंचासमक्ष, सदर वाहन चालकाचे नाव गाव विचारले असता वाहन चालकाने त्याचे नाव 01) सय्यद जहागीर सय्यद गुलाम रसुल वय 62 वर्ष रा मुबारक नगर आर्णी ता आर्णी जि यवतमाळ
तसेच वाहन क्लिनर याचे नाव
शेख कादर शेख छोटु वय 24 वर्षे रा अंतरगाव ह मु. अमराई रा आर्णी ता आर्णी जि यवतमाळ
असे सांगीतले. दोन पंचासमक्ष, सदर वाहनाच्या मागच्या बाजुची झडती घेतली असता सदर वाहनामधुन


1) पांढर्या रंगाचे 07 मोठे पोते, ज्यामध्ये सुंगधित विमल पान मसाला, प्रत्येक पोत्यामध्ये चार पिशवी, त्यापैकी एका पिशवी मध्ये 65 नग एका नगाची किंमत दिडशे रुपये असे 65 नगाची किंमत 9750/- रुपये, अशा एका पिशवीची किंमत तर चार पिशवी ची किंमंत 39000/- रुपये व असे एकुण सात पोत्याची किंमत दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये

2) पाढर्या रंगाचे 9 पोते ज्यामध्ये ईगल गुटखा ,शिखा तंबाखु, एका पोत्यामध्ये सहा पिशवी, एका पिशवी मध्ये अकरा ईगंल तंबाखुचे नग, एका नगाची किंमत’640/-रुपये असे एका पिशवीची किंमत 7040/- रुपये असे एका पांढर्या रंगाच्या ईगल तंबाखूच्या सहा पिशवीचे 42240/- रुपये असे एकुम 09 पोत्याची किंमत 3,80,160/-रुपये
3) लाल रंगाचे सात मोठे कट्टे ज्यामध्ये एका मोठ्या लाल कट्यामध्ये चार छोट्या पिशव्या प्रत्येक पिशवी मध्ये 65 नग,
प्रत्येकी नगाची किंमत 30/- रुपये असे एका पिशवीची किंमत 1950/-रुपये पैकी एका लाल कट्टया मधील चार पिशवीची किमंत 7800/- रुपये असे एकुण सात लाल मोट्या कट्ट्याची किंमत 54600/- रुपये
4) एक बोलेरो वाहन पिक अप क्रमांक एम एच 29 टी 6279 ज्याची किंमत अंदाजे 5 लक्ष रुपये असा एकुण प्रतिबंधीत
गुटखा पान मसालाची किंमत 707760/- तसेच जप्त वाहन 5 लाख असा एकुण 12 07760/-लाख रुपये मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

पुढील कारवाई करण्याकरिता अन्न व औषधी प्रशाषन विभाग यवतमाळ यांना पत्र व्यवहार करुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तजविज ठेवली आहे.
सदरची कारवाई . डॉ पवन बनसोड पोलिस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, आदित्य मिरखेलकर सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा याचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन नेर येथील सपोनि बाळासाहेब नाईक, पोउपनि किशोर खंडार, पोउपनि दिपक बदरके, सफौ नरेंद्र लावरे, अनिस सय्यद, पोकॉ योगेश शेळके, सतीश बहादुरे, नापोकॉ निलेश शिरसाठ,ना.पो.का/ योगेश सलामे, पो.कॉ पवन ढवळे यांनी केली.


