
नजीकच्या राज्यातुन विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणार्यास यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…,
पांढरकवडा हद्दीत नजीकच्या राज्यातुन विक्री करीता आणला जाणारा ०८.८७० किलोग्राम गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलिस ठाणे पांढरकवडा यांची संयुक्तिक कारवाई….
पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(०९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध व प्रलंबित गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने संशयीत आरोपींचा मागोवा घेत असतांना पथकास गोपनीय बातमीदारकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, एक निळया रंगाचे शर्ट व काळया रंगाचा पॅट घातलेला व्यक्ती एका प्लास्टीक चुंगडीमध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगुण रुंझा गावाचे बाहेरील यवतमाळ रोड वरील पेट्रोलपंपाजवळ उभा आहे.


अशा खात्रीशीर माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहीती देऊन त्यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस ठाणे पांढरकवडा येथील अधिकारी अंमलदार यांचे सह कारवाई करीता घटनास्थळी रवाना होऊन. व माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेत असतांना एक इसम माहिती मधील वर्णना प्रमाणे रुंझा गावाचे बाहेरील यवतमाळ रोड वरील पेट्रोलपंपाजवळ असलेल्या लिंबाचे झाडा जवळ हातात एक प्लास्टीकचे चुंगडे घेवुन असलेला ईसम दिसुन आल्याने त्यास पोलिस स्टाफ चे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव अलीम खान सलीम खान वय २९ वर्षे, रा. अबुबकर मस्जीद जवळ, शांतीनगर अदिलाबाद राज्य तेलंगना असे सांगीतल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात असलेल्या एका प्लास्टीक चुंगडीमध्ये खाकी टेपने गुंडाळलेल्या वेगवेगळया चार पाकीटामध्ये एकुण ०८. ८७० किलोग्राम गांजा किमंत १,०५,२०४/- रुपयाचा मिळुन आल्याने सदरचा गांजा व आरोपीचे अंगझडतीत मिळुन आलेला एक मोबाईल व नगदी पन्नास रुपये असा एकुण १,०५,७५४ रु मुद्देमाल जप्त करुन आरोपी अलीम खान सलीम खान वय २९ वर्षे, रा. अबुबकर अदिलाबाद राज्य तेलंगना याचे विरुध्द पोलिस ठाणे पांढरकवडा येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप,आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, दिनेश झांबरे, ठाणेदार पो.स्टे. पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, स्थागुशा यवतमाळ, पोउपनि देवेंद्र मेशकर, पो.स्टे. पांढरकवडा पोलिस अंमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, उल्हास कुरकुटे, धनंजय श्रीरामे स्था.गु.शा. यवतमाळ व मारोती पाटिल, सचिन काकडे, राजु बेलेवार पो.स्टे. पांढरकवडा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



