महागड्या गाड्यातुन देशी विदेशी दारुची तस्करी करणाऱ्यास शिरपुर पोलिसांनी केले जेरबंद
वणी शहरातुन आजुबाजुचे ग्रामीण भागात देशा-विदेशी दारुचा पुरवठा करणारा शिरपुर पोलिसांचे ताब्यात….
शिरपुर(यवतमाळ)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या व त्यानुसार शिंदोला परिसरात काही दारु विक्रेते लपूनछपून अवैध
दारुचा ठिय्या चालवतात. त्यात अग्रेसर असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी यापुर्वीही कारवाई केली आहे. तरीसुध्दा येरे माझ्या मागल्या प्रमाणे दिनांक १४/०१/२०२४ रोजी वणी शहरातून घेतलेल्या दारू साठ्याचा पुरवठा शिंदोला शिवारात करण्यात येणार आहे. या बाबत शिरपूर ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय राठोड यांना रेनॅाल्ट डस्टर कंपनीच्या चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची गुप्त माहीती खबरीकडुन मिळाली. त्यानुसार पोलिस स्टेशन शिरपुर येथील पथकाने रविवारी(१४ रोजी) दुपारी चारगाव चौकी येथे नाकाबंदी केली असता एक चारचाकी वाहन मिळालेल्या माहीतीप्रमाणे येतांना दिसले ज्याचा क्रमांक MH-29 AR- 1638 यास थांबवुन त्याची तपासनी केली असता त्यात देशी विदेशी दारुचा साठा आढळुन आला त्यानुसार या गाडीच्या चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव
राजू मारुती अलिवर रा. गायकवाड नगर, वणी यवतमाळ
असे सांगितले त्याला ताब्यात घेवुन. वाहनात ७२ नग RS कंपनीच्या विदेशी १८० मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. हा माल कोणाचा आहे असे कसून विचारणा केली असता तर हा माल
शेख आरिफ शेख इब्राहिम
याचा असल्याचे सांगितले. यावरुन शिरपुर पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 65 (अ) (ई) म दा का 109 भा द वी अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्ह्यातील दारुसाठा व चारचाकी वाहन रेनॅाल्ट डस्टर असा एकुन ५,१२,९६०/- रु चा मुद्देमाल जप्त केला असुन पुढील तपास शिरपुर पोलिस करीत आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागिय पोलिस अधिकारी,वणी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन शिरपुर सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय राठोड यांचे आदेशानुसार सुगत दिवेकर, आशिष टेकाडे, राजन इसनकर व अंकुश कोहचाडे यांनी केली.