
पोलिस आयुक्तांचे विशेष पथक(CIU)यांची अंमली पदार्थ MD याचेवर मोठी कार्यवाही…
पोलिस आयुक्तांच्या विशेष सि.आय.यु. पथकाची MD अंमली पदार्थावर कार्यवाही,31 ग्रॅम MD सह 4.26 लाखाचा मुद्देमाल जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – नव्याने रुजु झालेले पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणाया इसमांची माहीती काढण्याकरीता त्यांचे विशेष पथक(सी आय यु) हे दि. 19/06/2023 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की काही इसम MD पावडर विक्री करीता धर्मकाट्याकडुन नागपुरीगेट कडे येणार आहे


अशा माहीतीवरुन नमुद ठिकाणी नाकाबंदी करुन त्यांच्या जवळ असलेल्या सुझुकी बर्गमॅन कंपनीची पांढ-या रंगाची मोटारसायकल क्र. एम. एच. 02 क्र. एफ.एस. 1656 या दुचाकीवर दोन ईसम येतांना दिसले त्यांना थांबवुन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांने त्यांचे नाव 1) शेख अयान शेख रमजान वय 19 वर्ष रा. हबीब नगर अमरावती व 2) सैय्यद आफाक सैय्यद निझाम असे सांगीतले त्यांची झडती घेतली असता त्याच्या जवळील विना नंबरच्या सुझुकी बर्गमैन कंपनीची पांढ-या रंगाची मोटारसायकल मध्ये एम.डी. नावाच्या अंमली पदार्थाचे पाउच बाळगुन विक्री करण्याकरीता बाळगतांना आढळुन आले

दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातुन एकुन 31 ग्रॅम 580 मीली. ग्रॅम किंमत अंदाजे 2,22,000/-रु. चा माल, तसेच दोन मोबाईल कि.अ. 30,000/- रु. तसेच सुझुकी बर्गमॅन कंपनीची पांढ-या रंगाच्या दोन मो.सा. कि.अ. 1,60,000/- रु. तसेच नगदी 14,260/- रु. असा एकुन 4,26,260/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीने शासनाने बंदी घातलेला एम.डी. नामक अंमली पदार्थ जवळ बाळगला तसेच विक्री करणे करीता वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द कलम 22 (ब), 8 (क),29 एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे त्यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन गाडगे नगर. येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.स्टे. गाडगे नगर करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, पोलिस उपआयुक्त(गुन्हे) कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त परी १ सागर पाटील, सहा पोलिस आयुक्त(गुन्हे) शिवाजी बचाटे सहा. पो. आयुक्त(गाडगेनगर) अरुण पाटील. यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे पोहवा सुनिल लासुरकर, सुधिर गुडधे, जहीर शेख, ना.पो.शि. अतुल संभे, पो.शि. राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.


