
पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात
पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात
पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) रोजी राजीव गांधी नगर येथे केली.एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.


येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख याला परिमंडळ- 4 पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. गुरुवारी दरोडा व वाहन चोरी पथक 2 चे पथक येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे व गणेश लोखंडे यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख हा राजीव गांधी नगर, येरवडा येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने राजीव गांधी नगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

अशा प्रकारे ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,
सहायक पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी पथक 2 च्या पथकाने केली आहे.



