ऐन दिवाळीत पोलिस दलात उलथाापालथ! 90 बड्या भापोसे अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ऐन दिवाळीत महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार…..

मुंबई (प्नतिनिधी) –  दिवाळीत राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे.







राज्यातील पोलिस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या आठवड्यात अपर पोलिस महासंचालक, पोलिस सहआयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. गृहविभागाने त्यासंदर्भातील तयारी पूर्ण केली असून, पात्र अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवर गुरुवारी शेवटचा हात फिरवण्यात आल्याची चर्चा पोलिस दलात रंगली होती.
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, या बदल्यांमध्ये मुंबई पोलिस आयुक्तालय, एसीबी मुख्यालय, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, सायबर सेल, सुरक्षा विभाग, फोर्स वन, मिरा-भाईंदर आणि ठाणे-पोलिस विभागांतील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. एकूण 90 उच्चपदस्थ अधिकारी, त्यात 58 ते 60 पोलिस उपायुक्त (DCP) दर्जाचे अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे.याअनुषंगाने मनपसंद बदलीसाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही सुरु झाल्या आहेत



मे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात गृहविभागाने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या तरी अजूनही 60 हून अधिक अधिकारी त्या यादीतून राहिले आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी एक वर्षाहून अधिक काळ त्याच पदावर कायम आहेत. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी बदलीला स्थगिती मिळवली असून, काहींनी पसंतीची ठिकाणे गृहविभागाला सुचवली आहेत. तर, डीसीपी दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेत चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळते.



दिवाळीपूर्वी किंवा तत्काळ नंतर या बदल्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फेरबदलांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.या बदल्यांमध्ये अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी मिलिंद भारंबे, आशुतोष डुंबरे, निकित कौशिक, विश्वास नांगरे पाटील, मधुकर पांडे, यशस्वी यादव, कृष्ण प्रकाश आणि विनयकुमार चौबे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

तसेच पोलिस अधिक्षक दर्जाचे विशाल आनंद,अनुज तारे,हर्ष पोद्दार,निलोत्पल यांचे बदलीची चर्चा आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!