कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,१४ गोवंशांची केली सुटका….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यामधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका करुन एकुण २१,००,०००/–रु चा मुद्देमाल केला जप्त…..

वर्धा(प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य व्यवसायांवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, नॅशनल हायवे क्रमांक ४४ ने जाम कडुन हिंगणघाट रोडने ट्रक मध्ये अवैद्यरीत्या गोवंश जनावरांना कोंबुन क्रुरतेने व निर्दयतेने भरुन कत्तली करीता वाहतुक करीत आहे.
अशा माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हिंगणघाट परीसरातील सरकारी दवाखाना चौक परीसरात नाकेबंदी करीत असतांना त्यांना एक संशयीत ट्रक येतांना दिसला तो माहीती प्रमाणे असल्याचे संशयावरुन त्यास सरकारी दवाखाना चौक, हिंगणघाट परीसरात थांबवुन पाहणी केली असता सदर ट्रक मध्ये कत्तली करीता निर्दयतेने कोंबुन गोवंश जातीची एकुण १४ जनावरे ज्यांना दाटीवाटीने भरुन क्रूरतेने व निर्दयतेने वाहतुक करीत असतांना मिळुन आले







सदर ट्रकचे चालक अनुक्रमे १) मोहतशीम आलम मुक्तार अन्सारी, वय ४१ वर्षे,रा. कामठी, जिल्हा नागपुर, २) इम्रान खॉन मुस्ताक खॉन, वय ३८ वर्षे, रा. कामठी, जिल्हा नागपुर, असे सांगुन त्यांचे
वाहन मालक आरोपी क्रमांक ३) फिरोज कुरेशी, रा. कामठी, जिल्हा नागपुर यांचे सांगणे प्रमाणे सदर गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन १) गोवंश जातीचे एकुण १४ लहान मोठी जनावरे प्रती नग २०,००० /- रु प्रमाणे २,८०,००० /- रु. २) एक अशोक लेलॅन्ड आयसर कंम्पनीचा मालवाहु ट्रक क्रमांक एमएच ४० सिटी ०४३४ किंमत १८,००,००० /- रु ३) दोन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत २०,००० /- रु असा एकुण
जु. किंमत २१,००,००० /- रु चा मुद्देमाल जप्त करुन वरील सर्व तिन्ही आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टशेन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयातील जप्त करण्यात आलेले संपुर्ण १४ गोवंश जनावरांची सुखरुप सुटका करुन त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने व चारा पाण्याची व्यवस्था करीता गोरंक्षण संस्थे मध्ये ठेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक  बालाजी लालपालवाले, पोहवा हमीद शेख, अमर लाखे, चंद्रकांत बुरंगे, अमरदिप पाटील, सचिन इंगोले, भुषण निघोट, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सागर भोसले, दिपक साठे, मिथुन जिचकार, राहुल अधवाल, . रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!